चंद्रपूर- आमदार असताना विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी आपण बरीच कामे केली. तसेच पुढील काळात विकासाच्या विविध संकल्पना आहेत. आपण साथ द्या, मी गोंडपिपरी तालुक्याचा कायापालट करतो, असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी केले. गोंडपिपरीतील प्रचारसभेत ते बोलत होते.
सुरुवातीला बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यानंतर पक्षीय कार्यालयासमोर प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणातुन सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. सभेदरम्यान मुसळधार पाऊस झाल्याने सभा काही वेळातच आटोपती घ्यावी लागली.