महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या रायटरसह सुरक्षा रक्षकाला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक; रायटरचा आत्महत्येचा प्रयत्न - चंद्रपूर पोलीस अधिकारी रायटर लाच बातमी

राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या कार्यालयाचे समोर एक पान टपरी आहे. तिथे पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार पान ठेल्यावर ५० हजाराची लाच स्वीकारताना काल सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारीचे रायटर राजेश त्रिलोकवार व सुरक्षा रक्षक सुधांशू मडावी या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक मडावी यांची घटनास्थळी मोटरसायकल मिळाली. या मोटरसायकलचे डिक्कीत 2 लाख ६० हजाराची रोकड मिळाली. त्यामुळे नेमकी किती लाचेची मागणी केली याचीही चौकशी सुरू आहे. याच दरम्यान काल रात्री रायटर त्रिलोकवार याने शौचास जाण्याच्या बहाण्याने तलावाजवळ जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

subdivisional police security guard arrested for accepting rs 50000 bribe that time reuters suicide attempt in chandrapur
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या रायटरसह सुरक्षा रक्षकाला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक

By

Published : Apr 30, 2022, 3:08 PM IST

चंद्रपूर - बल्लारपुरातील एका दारूविक्रेत्याकडून राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे रायटर राजेश त्रिलोकवार व सुरक्षा रक्षक सुधांशू मडावी यांना ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली. तर गाडीच्या डिक्कीतुन तब्बल 2 लाख 60 हजार मिळाले होते. या प्रकरणी बदनामी आणि भीतीपोटी रायटर त्रिलोकवार याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. काल शुक्रवारी रात्री पोलिसांच्या ताब्यात असताना शौचास जाण्याच्या बहाण्याने त्याने तलावात उडी मारल्याचे समोर आले आहे, पोलिसांच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला.

नागपूरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार - बल्लारपुरातील एका बड्या दारूविक्रेत्याला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी पोलिस दलाकडून सातत्याने लाचेची मागणी होत होती. दरम्यान सातत्याने पैसे दिल्यानंतरही पैशाची भूक शमत नसल्याने संबंधित विक्रेत्याने नागपूरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर नागपूर प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षक श्रीमती चाफले व पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे प्रतिबंधक विभागाचे पथक नागपुरातून राजुरा येथे दाखल झाले. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या कार्यालयाचे समोर एक पान टपरी आहे. तिथे पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार पान ठेल्यावर ५० हजाराची लाच स्वीकारताना काल सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारीचे रायटर राजेश त्रिलोकवार व सुरक्षा रक्षक सुधांशू मडावी या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक मडावी यांची घटनास्थळी मोटरसायकल मिळाली. या मोटरसायकलचे डिक्कीत 2 लाख ६० हजाराची रोकड मिळाली. त्यामुळे नेमकी किती लाचेची मागणी केली याचीही चौकशी सुरू आहे. याच दरम्यान काल रात्री रायटर त्रिलोकवार याने शौचास जाण्याच्या बहाण्याने तलावाजवळ जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच मोठे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही वसुली कुणाकुणापर्यंत जात होती. याच्या खोलपर्यंत एसीबी जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details