चंद्रपूर :चंद्रपूरात 68 व्या विदर्भ साहित्य संमेलानाचे ( Vidarbha Sahitya Sammelan in Chandrapur ) आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात अनेक जण हजेरी लावत आहेत. या संमेलना दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विदर्भ साहित्य संमेलनासाठी विद्यार्थ्यांना चक्क ट्रकमधून ( Students travel in unfit trucks ) आणण्यात येत असल्याचा प्रकरण समोर आले आहे. साहित्य समेलनासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकारावर आता संपात व्यक्त केला जात आहे.
Vidarbha Sahitya Sammelan : विदर्भ साहित्य संमेलनासाठी विद्यार्थ्यांचा ट्रकमधून जीवघेणा प्रवास - विदर्भ साहित्य संमेलन विद्यार्थ्यांचा ट्रक प्रवास
विदर्भ साहित्य संमेलनासाठी ( Vidarbha Sahitya Sammelan ) विद्यार्थ्यांना चक्क ट्रकमधून आणण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे फिटनेस नसलेल्या ट्रकमध्ये या मुलांना कोंबण्यात ( Students travel in unfit trucks ) आले होते. आरटीओ विभागाने कारवाई केल्याने ही बाब समोर आली. योग्यता प्रमाणपत्र आणि विमा नसलेला हा जीवघेणा ट्रक आरटीओने जप्त केला. तब्बल दोन तास विद्यार्थ्यांना आरटीओ कार्यालयात ताटकळत बसावे लागले. शेवटी तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना आॅटोने पाठविले आणि ते ग्रंथदिडींत सामील झाले.
विदर्भ साहित्य संमेलन :गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ आणि सुर्यांश साहित्य व संस्कृती मंच, चंद्रपूर साहित्य संमेलनाचे आयोजक आहे. येथील प्रियदर्शीन इंदिरा गांधी सभागृहात साहित्य संमेलनाला काल शुक्रवारपासून प्रारंभ झाला. समारोप उद्या रविवारी होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद काटकर यांना १४ डिसेंबरला एक फतवा जारी केला. सर्वोदय शिक्षण मंडळाशी संबंधित शाळा- महाविद्यालयाच्या शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संमेलनाला उपस्थित राहणे बंधनकारक केले. हे प्रकरण ताजे असतानाच उद्घाटनाच्या दिवशीच आणखी एका गंभीर प्रकार घडला.
ट्रकमधून जीवघेणा प्रवास :ग्रंथदिडीत सहभागी होण्यासाठी सन्मित्र सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गणवेशात बोलविण्यात आले. मात्र आयोजकांना त्यांच्या प्रवासाची कोणतीही व्यवसाय केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका मालवाहू ट्रकमध्ये कोंबण्यात आले. सैनिक स्कूल ते संमेलनाचे स्थळ तब्बल १२ किलोमीटर अंतराचे आहे. विद्यार्थ्यांचा मालवाहू ट्रकमधील जीवघेणा प्रवास सुरु झाला. त्या ट्रकची स्थिती बघता आरटीओच्या पथकाने त्याला वाटेत अडविले. तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या ट्रककडे उपयोगिता प्रमाणपत्र आणि विमा नव्हता. आरटीओच्या पथकाने ट्रक जप्त केला आणि कार्यालयात लावला. तब्बल दोन तासापर्यंत विद्यार्थी आरटीओ कार्यालयात ताटकळ होते. शेवटी आरटीओ अधिकाऱ्यांनीच स्वर्चाने त्यांना आॅटोत बसविले आणि कार्यक्रम स्थळी पाठविले. त्यानंतर ते ग्रंथदिडींत सामील झाले. मात्र झाल्या प्रकाराची चिंता आणि पश्चाताप आयोजकांपैकी एकालाही नव्हता. ग्रंथदिंडीसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याच अधिकार कुणी दिला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.