चंद्रपूर - शिक्षणासाठी दिल्लीत गेलेले राज्यातील विद्यार्थी तिथे अडकून पडलेले आहेत. यासाठी राज्य सरकारचे पूर्ण नियोजन झाले असून त्यांना रेल्वेने परत आणण्यात येणार आहे. मात्र, यासाठी केजरीवाल सरकारने अद्याप मंजुरी दिली नाही. ती मिळताच हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतणार, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
'दिल्लीत अडकलेले विद्यार्थी राज्यात परत येणार, केजरीवाल सरकारच्या संमतीची प्रतीक्षा' - केजरीवाल सरकार
शैक्षणासाठी दिल्लीला गेलेले आणि तिथेच अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रेल्वेने दिल्लीहून नागपूरमार्गे मुंबईला आणण्यासाठी राज्यशासनाने तयारी केली असून केवळ दिल्ली सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
