चंद्रपूर - शहरात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती. या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यावर वसतीगृहातील त्याचे सहकारीच त्याचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू होता. त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 11 विद्यार्थी आणि 3 वसतीगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विकृतीचा कळस! चंद्रपुरात तरुणावर 14 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, तरुणाची आत्महत्या - चंद्रपूर विद्यर्थी आत्महत्या
शहरात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 18 जानेवारीला समोर आली होती.
हेही वाचा - चंद्रपुरात सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर
5 जानेवारीला पीडित विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. यादिवशी देखील जवळपास 14 जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. यामुळेच त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोमवारी पोलिसांना तपासात एक वही आढळली, ज्यात त्या मुलाने त्याच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती नमूद केली आहे. मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना त्या होस्टेलचे अधिकारी काय करत होते? त्यांना याची कल्पना आली नाही का? हा सर्वात मोठा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.या प्रकरणात पोलीस वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.