चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. शिवम मनोहर भानारकर (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्याचा वीज टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे, की अपघात आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -मुलाचा खून करून वडिलांचे आत्मसमर्पण, बल्लारपूर येथील घटना
याबाबत अधिक माहिती अशी की, बलदेव खिरटकर यांच्या शेतात दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळला. दरम्यान या घटनेची शंकरपूर माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तर पोलीस हा अपघात आहे की, आत्महत्या याचा तपास करत आहेत.