चंद्रपूर- जिल्ह्यात 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी चंद्रपूर केंद्रात आयोजित करण्यात आली होती. यात राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रातून 'हॅलो राधा, मी रेहाना' या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सोबत दिग्दर्शन आणि अभिनयातही चंद्रपूरच्या या नाटकाने बाजी मारली आहे.
राज्य नाट्य स्पर्धा; चंद्रपूरच्या 'हॅलो राधा, मी रेहाना' नाटकाला प्रथम पारितोषिक - drama competition
चंद्रपूरसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 12 नाटके सादर करण्यात आली. यात चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या 'हॅलो राधा, मी रेहाना' ह्या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले
चंद्रपूरसह वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 12 नाटके सादर करण्यात आली. यात चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या 'हॅलो राधा, मी रेहाना' ह्या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. दुसरा क्रमांक नवोदिता संस्थेच्या 'त्वचेचीया राना' तर तृतीय क्रमांक अस्मिता रंगायतन सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था, यवतमाळच्या 'आखेट' या नाटकाला मिळाला आहे.
दिग्दर्शनात जयश्री कापसे-गावंडे प्रथम तर द्वितीय प्रशांत कक्कड ह्यांना पारितोषिक मिळाले. अभिनयात अनुक्रमे अशोक आष्टीकर आणि नूतन धवने यांना रौप्यपदक प्राप्त झाले.