महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा राज्य सरकारचा निर्णय - चंद्रपूर दारूबंदी

राज्यात सत्तापालट झाली आणि वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. जिल्ह्यातील दारुबंदी उठविणार अशी घोषणा त्यांनी केली होती. अखेर आज 27 मे रोजी जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार

By

Published : May 27, 2021, 8:41 PM IST

चंद्रपूर - सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. तेव्हापासूनच जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. याबाबत तत्कालीन विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाम भूमिका घेतली होती. राज्यात सत्तापालट झाली आणि वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. जिल्ह्यातील दारुबंदी उठविणार अशी घोषणा त्यांनी केली होती. अखेर आज 27 मे रोजी जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

2015 पासून होती दारूबंदी

राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची घोषणा केली. यानंतर 1 एप्रिल 2015 ला हा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही दारुबंदी केवळ कागदावर असल्याचे चित्र दिसून येत होते. जिल्ह्यात हळूहळू दारु तस्करांचे रॅकेट सक्रिय झाले. शेजारच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा तसेच लगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात होती. राजकीय आशीर्वाद आणि काही पोलिसांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय जोमात सुरू होता. शाळेकरी मुलांचा देखील यात वापर केला जात असल्याचे समोर आले होते. तसेच बनावट दारूच्या व्यवसायाने देखील जम बसायला सुरुवात झाली होती.

वडेट्टीवारांनी शब्द केला पूर्ण -

मागील सहा वर्षांत 60 कोटींहून अधिकची दारू विकल्या गेली. यात पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या हजारोंच्या घरात आहे. तसेच स्थानिक रोजगाराचा प्रश्न देखील या माध्यमातून निर्माण झाला होता. यावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर भूमिका घेतली. जिल्ह्यातील दारुबंदी आपण हटविणार असे वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. या दारुबंदी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समीक्षा समिती नेमण्यात आली होती. यावर सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या. यात ही दारुबंदी हटविण्यात यावी यावर प्रतिक्रियेत बहुमत असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा 13 सदस्यीय समिती नेमण्यात आली. या समितीने हा अहवाल मंत्रीमंडळाकडे पाठविला. अखेर यावर दारुबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details