चंद्रपूर -जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. बाजार समिती आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(सीसीआय) कापूस खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. कोरपना तालुक्यातील सोनूर्ली येथील खरेदी केंद्रावर चाललेली मनमानी शेतकऱयांनी आंदोलन करत उघड केली.
कापूस खरेदी प्रश्न: सोनुर्ली कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चंद्रपूर-तेलंगाणा महामार्गावर चक्का जाम आंदोलन
सोनूर्ली कापूस केंद्रावर अचानक खरेदी बंद करण्यात आली त्यामुळे हजारो कापूस गाड्यांसह शेतकरी या केंद्रावर खोळंबले आहेत. त्यांनी चंद्रपूर-तेलंगाणात जाणारा महामार्ग रोखून धरत आंदोलन केले गेले असून या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
केंद्रावर अचानक खरेदी बंद करण्यात आली त्यामुळे हजारो कापूस गाड्यांसह शेतकरी या केंद्रावर खोळंबले आहेत. त्यांनी चंद्रपूर-तेलंगाणात जाणारा महामार्ग रोखून धरत आंदोलन केले गेले असून या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. तत्काळ कापूस खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
कोरपना तालुक्यातील बहुतांश शेतकऱयांचा कापूस आजही घरात पडलेला आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने या हंगामासाठी शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. अशात कापूस खरेदी केली जात नसल्याने बळीराजा संतापला आहे. सोनूर्ली येथील कापूस खरेदी केंद्रावर मनमानी कारभार सुरू आहे. दिवसातून केवळ 20 शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी सुरू असल्याने हजारो गाड्यांसह शेतकरी या केंद्रावर खोळंबले आहेत.