चंद्रपूर -ज्या जावयाचा पाहुणचार केला, ज्याला मानपान दिला. त्याच जावयाने स्वतःच्या सासूच्या घरीच घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या अट्टल जावयाचे नाव पृथ्वी अशोक तायडे असे आहे. त्याला दिर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.
मात्र घरात संशयास्पद असं कोणीच आढळल नव्हतं-
दुर्गापुरातील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहणाऱ्या गंगा विजयकर यांच्या घरी सोमवारी चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. विजयकर यांचा घरून सोन्याचे दागिने, एकूण 1 लाख 37 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. त्यानंतर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुर्गापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मनोहर जाधव व सूरज लाटकर यांनी तपास सुरू केला. घरच्यांची विचारपूस केली. मात्र घरात संशयास्पद असं कोणीच आढळल नव्हतं.
आणि सासूबाईला बसला मोठा धक्का -