चंद्रपूर - सिंदवाही तालुक्यातील विविध ठिकाणी आकाशातून उपग्रहाचे अवशेष आढळून येत आहेत. आतापर्यंत तीन अवशेष आढळून आले होते. आता चौथा अवशेष आज (दि. 4 एप्रिल)रोजी याच तालुक्यातील असोलामेंढा तलावात आढळून आला आहे. शनिवारच्या रात्री सिंदवाही तालुक्यातील लाडबोरी गावाच्या लोकांनी जोराचा आवाज ऐकला. (Some remnants of the satellite) पुढे हा आवाज विमानासारखा झाला. मात्र, त्यानंतर एखादा मोठा स्फोट झाल्याचे गावकऱ्यांनी ऐकले. वास्तविक उपग्रहाचे तुकडे या ठिकाणी जळून पडले होते. एक मोठी रिंग एका बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर पडली. आठ ते दहा इंच जाडी आणि जवळपास 40 किलो वजन या रिंगचे आहे.
दोन धातूचे गोळे आढळले - शनिवारच्या रात्री सिंदवाही तालुक्यातील लाडबोरी गावाच्या लोकांनी जोराचा आवाज ऐकला. पुढे हा आवाज विमानासारखा झाला. मात्र, त्यानंतर एखादा मोठा स्फोट झाल्याचे गावकऱ्यांनी ऐकले. वास्तविक उपग्रहाचे तुकडे या ठिकाणी जळून पडले होते. एक मोठी रिंग एका बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर पडली. दहा बाय दहा आकाराची, आठ ते दहा इंच जाडी आणि जवळपास 40 किलो वजन या रिंगचे आहे. यानंतर रविवारी पवनपार आणि मेरेगाव या ठिकाणी दोन धातूचे गोळे आढळले. त्यानंतर आज सोमवारी असोलामेंढा तलावाजवळ गोलाकार वस्तू पुन्हा आढळून आली आहे.
या अगेदरही असेच उपग्रहाचे काही अवशेष आढळून आले -उपग्रह अवकाशात पाठवताना त्याचे योग्य नियोजन आणि पुरेपूर तयारी करावी लागते. मात्र काल रात्री जी दुर्घटना झाली. त्यात तांत्रिक किंवा मानवी चूक कारणीभूत आहे. त्यामुळे उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.
कुठलीही जीवितहानी झाली नाही - उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.