चंद्रपूर: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption Department) 50 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी ( In case of taking bribe ) 3 मे च्या रात्री मृद व जलसंधारण अधिकारी कविजित पाटील (नागपूर), श्रावण शेंडे (ब्रह्मपुरी) व रोहित गौतम (चंद्रपूर) यांना अटक केली. न्यायालयाने लाचखोर अधिकाऱ्यांची 6 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. दरम्यान या गुन्ह्याचा सूक्ष्म तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनामिका मिर्झापुरे आणि टीम करत आहे. शुक्रवारी सायंकाळी मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आल्याने जलसंधारण विभागात खळबळ उडाली आहे.
लेखापालच्या घरी सापडले 4 लाख 90 हजार:एसीबीच्या 3 पथकाच्या संयुक्त कारवाईची चर्चा असतांना तिन्ही अधिकाऱ्यांनी 81 लाखांची मागणी कशी केली, कुणासाठी केली याचा शोध आता सुरू आहे. गुरुवारी या अधिकाऱ्यांच्या घरांची झडती घेतली असता रोहित गौतम यांच्या घरी 4 लाख 90 हजार रोख सापडली होती. तपासाचा भाग म्हणून जलसंधारण विभागाचे चंद्रपूर येथील कार्यालय सील केले तरी तपास चंद्रपुर, ब्रह्मपुरी व नागपूर भोवती फिरत आहे.