महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Skywatch Group Chandrapur : जबाबदार यंत्रणा स्वतःहून समोर येण्याची शक्यता कमीच; उपग्रहाच्या दुर्घटनेबाबत तज्ज्ञांच मत - स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक चंद्रपूर

उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.

चंद्रपुरात आढळलेले उपग्रहाचे अवशेष
चंद्रपुरात आढळलेले उपग्रहाचे अवशेष

By

Published : Apr 3, 2022, 8:58 PM IST

Updated : Apr 3, 2022, 9:24 PM IST

चंद्रपूर -उपग्रह अवकाशात पाठवताना त्याचे योग्य नियोजन आणि पुरेपूर तयारी करावी लागते. मात्र काल रात्री जी दुर्घटना झाली. त्यात तांत्रिक किंवा मानवी चूक कारणीभूत आहे. त्यामुळे उपग्रह सोडताना त्याच्या वेगळ्या झालेल्या वस्तू अंतराळातून पसरता त्या पृथ्वीवर आल्या. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण घटनेचा योग्य तो तपास होईलच, मात्र इतकी मोठी घटना घडल्यावर याला जबाबदार यंत्रणा स्वतः पुढे येऊन जबाबदारी घेण्याची शक्यता ही फारच कमी असल्याचे मत स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासक मंडळींनी व्यक्त केली आहे.

स्कायवॉच ग्रुपच्या खगोलशास्त्रीय अभ्यासकांशी संवाद साधताना प्रतिनिधी
काल रात्री अचानक आकाशात उल्कापात होत असल्याचे आढळून आले. मात्र हा कुठला उल्कापात नसून एक उपग्रह सोडताना त्याचे आकाशातून पडलेले तुकडे होते ही बाब समोर आली. यातील एक मोठा तुकडा सिंदेवाही येथील लाडबोरी या गावात पडला. ऐन गावाच्या मधोमध पडला मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जवळपास चाळीस किलोंची एक गोल तबकडी एका खाली प्लॉटवर पडली. यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच ही तबकडी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तहसीलदार यांच्या निर्देशानुसार या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि तलाठीचे पथक नेमण्यात आले. त्यानुसार आज सकाळी पवनपार येथिल एका तलावालगत साधारण पाच किलोचा धातूचा गोळा आढळून आला. तो देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

'...म्हणून ते अवशेष कोसळले असावे' :जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आज ( रविवारी ) खगोलशास्त्रीय अभ्यासकांचा स्कायवॉचचा ग्रुप घटनास्थळी गेला होता. या ग्रुपचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे, प्रा. सचिन वझलवार, प्रा. योगेश दुधपचारे यांनी घटनास्थळी जाऊन तबकडी आणि एक धातूचा गोळा या दोन्ही वस्तूंचे तांत्रिक निरीक्षण केले. त्याच्या नोंदी त्यांनी घेतल्या असून या संदर्भातील माहिती ते इत्स्रो आणि इतर संशोधन संस्थांकडे पाठविणार आहेत. त्यांच्या अभ्यासात हे उपग्रह सोडताना त्याचे अवशेष असल्याचे समोर आले. त्यांच्या अंदाजानुसार एका अमेरिकन कंपनीचे दोन रॉकेत न्यूझीलंड येथून सोडण्यात आले. पृथ्वीच्या कक्षेत येऊन पृथ्वीचे निरक्षण करण्याचे काम हे उपग्रह करणार होते. मात्र, रॉकेट उडविण्यामागे जगातील इतर देशांचे तंत्रज्ञान हे खूप समोर आहे. मात्र यात कदाचित चूक झाली असावी ज्यामुळे हे अवशेष समुद्रात किंवा वाळवंटात पडण्याऐवजी मानवी वस्तीत पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी ही अत्यंत गंभीर चूक असून याची स्वतःहून जबाबदारी घेण्यास कुठली यंत्रणा समोर येणार नसल्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा -Satellite Pieces Found At Wardha : चंद्रपूरनंतर आता वर्ध्याच्या वाघेडा ढोक शिवरातही सापडले उपग्रहाचे अवशेष

Last Updated : Apr 3, 2022, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details