महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आनंदवनच्या प्राचार्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस; कोरोनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचा ठपका - anandwan warora chandrapur news

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये बंद आहेत. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने 10 जूनला अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना तशा सूचना दिल्या. मात्र, आनंद निकेतन महाविद्यालय या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. यावरून 2 जुलैला गोंडवाना विद्यापीठाने आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावला.

आनंदवनच्या प्राचार्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस
आनंदवनच्या प्राचार्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटीस

By

Published : Jul 3, 2020, 8:01 PM IST

चंद्रपूर :कोरोनाच्या काळात गोंडवाना विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना प्रतिबंधक उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या. मात्र, त्या सूचनांचे उल्लंघन होत असल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी आनंदवन येथील आनंद निकेतन महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासंबंधी प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांना याबाबतचा खुलासा मागण्यात आला आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये बंद आहेत. मात्र, येणाऱ्या काळात ते चालू होऊ शकतात. त्यामुळे महाविद्यालयात कार्यालयीन कामे सुरू आहेत. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कोरोनाबाबत प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने 10 जूनला अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना तशा सूचना दिल्या. मात्र, आनंद निकेतन महाविद्यालय या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले. यावरून 2 जुलैला गोंडवाना विद्यापीठाने आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावला.

यामध्ये 15 टक्के कर्मचारी कामावर रुजू होतील अशी सूचना असताना सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना रुजू होण्याची सक्ती महाविद्यालयाकडून करण्यात येत आहे. तसेच उपस्थित न राहिल्यास वेतन कपात करण्याच्या धमक्या दिल्या जातात अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोना विषयीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असतानाही याकडे महाविद्यालय दुर्लक्ष करत असून ही बाब अतिशय गंभीर असल्याचा शेरा देखील देण्यात आला आहे. याचा तत्काळ खुलासा करण्याचे निर्देश आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काळे यांना देण्यात आले आहेत. यासंदर्भात डॉ. काळे यांना संपर्क केला असता त्यांनी ह्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच यासंबंधीचे स्पष्टीकरण आपण गोंडवाना विद्यापीठाला पाठविण्यात आले असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

या आहेत महाविद्यालयांना सूचना :

- कार्यालयात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतू अ‌ॅप वापरणे बंधनकारक असून याची जबाबदारी विभागप्रमुख यांची राहील.

- महाविद्यालयाच्या कामकाजासाठी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना फक्त 15 टक्के प्रमाणात उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत.

- 15 टक्के कर्मचारी किंवा 15 कर्मचारी यामध्ये जी संख्या अधिक असेल त्यानुसार निर्णय घेणे.

- प्रशासकीय कामकाजासाठी इमेल, व्हाट्सअ‌ॅप आणि एसएमएस हे माध्यम ग्राह्य धरण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details