चंद्रपूर- कारवाईच्या नावावर पोलिसांनी पैसे घेतले मात्र कारवाई अद्याप केली नाही असा आरोप करत एक तरुण थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील टॉवरवर चढला. या तरुणाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तौसिफ खान असे या तरुणाचे नाव आहे.
'वीरुगिरी' करत पोलिसांचा केला निषेध, पैसे उकळल्याचा तरुणाचा आरोप - पोलीस
तौसिफ खान हा रामनगर पोलीस ठाण्यात आला होता. त्याने १४ तारखेला एक तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई म्हणून त्याच्याकडून रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि अन्य सहकाऱ्यांनी ६० हजार रुपये घेतले होते.
तौसिफ खान हा रामनगर पोलीस ठाण्यात आला होता. त्याने १४ तारखेला एक तक्रार दाखल केली होती. त्यावर कारवाई म्हणून त्याच्याकडून रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि अन्य सहकाऱ्यांनी ६० हजार रुपये घेतले होते. मात्र, पैसे देऊनही पोलिसांनी काम केले नाही, असा आरोप या तरुणाने केला आहे.
वारंवार चकरा मारूनही पोलिसांनी कारवाई न केल्याने हा तरुण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरातील टॉवरवर चढला. भर उन्हात हा तरुण दोन तास टॉवरवर चढून होता. अखेर तो खाली आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. हा प्रकार नेमका काय होता याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केला नाही. मात्र, रामनगर पोलिसांनी आपल्याकडून पैसे घेतले असा थेट आरोप या तरुणाने केला आहे. यामुळे पोलीस गोटात खळबळ उडाली आहे.