महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी आजीवन वाट बघेन, शीतल आमटेंच्या पतीची भावनिक पोस्ट - shital amte Karjagi

गौतम करजगी यांनी त्यांच्या पत्नी शीतल आमटे-करजगी यांना त्यांच्या वाढदिवशी पत्र लिहिले आहे. यात गौतम यांच्या जीवनात शीतल यांचे किती मोठे स्थान होते, याचा उल्लेख करण्यात आला आहे. मी, तू परत येण्याची आजीवन वाट बघत राहील, असे म्हणत आपल्या भावनांना गौतम करजगी यांनी वाट करून दिली.

shital amte family
शीतल आमटेंसह कुटुंब

By

Published : Jan 28, 2021, 3:19 PM IST

Updated : Jan 28, 2021, 4:08 PM IST

चंद्रपूर -महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्यांचे पती गौतम करजगी अजूनही सावरले नाहीत. शीतल आमटे यांच्या वाढदिवशी त्यांना संबोधून करजगी यांनी पत्र लिहिले आहे. यात करजगी यांच्या जीवनात शीतल यांचे किती मोठे स्थान होते, याचा उल्लेख करण्यात आला आहे. मी, तू परत येण्याची आजीवन वाट बघत राहील, असे म्हणत आपल्या भावनांना गौतम करजगी यांनी वाट करून दिली.

गौतम यांचे पत्र

हेही वाचा -चंद्रपूरात दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य; शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी यांचे आदेश

गौतम यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. 27 जानेवारीला शीतल यांचा 40 वा वाढदिवस होता. कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी विख्यात झालेल्या आनंदवनाची स्थापना बाबा आमटे यांनी केली होती. त्यांची तिसरी पिढी म्हणून या कार्यात डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे-करजगी उतरल्या होत्या. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या काम करीत होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती गौतम करजगी देखील आनंदवनाचे काम बघत होते. मात्र यानंतर आमटे कुटुंबीयांत वाद निर्माण झाले. याच दरम्यान 30 नोव्हेंबरला डॉ. शीतल आमटे यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी विष असलेले इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती.

काय लिहिले पत्रात?

प्रिय शीतल (सोना), आज तुझा 40 वा वाढदिवस. तू माझ्या खूप दूर आहेस, तरीही तितकीच जवळ आहेस. तुला गच्चपणे मिठीत घ्यावेसे वाटते. पण, कधी स्वप्नातही वाटले नव्हते, की तुला अशा पद्धतीने शुभेच्छा द्याव्या लागतील. मला आजही विश्वास बसत नाही, की तू माझ्या जवळ नाहीस. आपण दोघांनी मिळून अशा कितीतरी योजना आखल्या, की आपण चाळीशी नंतर काय करणार आहोत. तू नेहमी म्हणायची, आपल्या आयुष्यात वर्षांची भर टाकण्यापेक्षा त्या वर्षात आयुष्य ओतणे अधिक महत्वाचे आहे. शीतल तू माझ्यासाठी झगमगनारा अढळ तारा आहे आणि नेहमी असशील.

तू आनंदवनाची खरी ओळख मला करून दिलीस आणि ध्येयपूर्ण आयुष्याचे महत्व पटवून दिलेस. तू एक उत्कृष्ट मुलगी, मैत्रीण, गुरू, आई आणि पत्नी होतीस. बाबा (बाबा आमटे) आणि ताईची (साधनाताई आमटे) यांची तू खरी अनुयायी होतीस. मला अत्यंत दुःख वाटते, ते याचे की ज्यांची तू काळजी केलीस त्यांनी तुझा आणि माझाही विश्वासघात केला. ते तुझ्यातून आपली सुटका करण्यास यशस्वी झालेत, पण ताई आणि बाबाबनंतर तुने स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेले तुझे अढळ स्थान कधीही नष्ट करू शकले नाहीत. तुझ्या हृदयात असलेले आनंदवन वेगळे करू शकले नाहीत.

आज तुझ्या वाढदिवशी मी वचन देतो, शर्वीलला (मुलगा) मी तसेच वाढविणार जशी तुझी इच्छा होती. त्याच्यात तीच मुल्ये रुजविणार ज्यावर तू आयुष्य जगलीस. आज मला खात्रीशीर असे वाटते, की तू आज पुन्हा जन्म घेतला, अशा कुटुंबात जिथे मुलींची काळजी घेतली जाते. जिथे मुलीला प्रेम आणि मायेची ऊब दिली जाते, ज्यासाठी तुझ्या पालकांकडून तू आजीवन उपेक्षित राहिलीस. मी माझ्या झगमगत्या ताऱ्याची आजीवन वाट बघत राहीन. तुझाच गौतम.

हेही वाचा -चाऱ्यात लपवून दारूची तस्करी, दोन आरोपींना अटक

Last Updated : Jan 28, 2021, 4:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details