महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati Violence : ठराविक पक्षाच्या लोकांनी अमरावतीत दुकानांवर हल्ले करत लघुउद्योग बंद पाडले - शरद पवार - लघुउद्योग बंद पाडले

दंगलींना प्रत्युत्तर म्हणून देशावर राज्य करणाऱ्या पक्षाच्या विचारसरणीच्या लोकांनी आणखी एक प्रकारची दंगल घडवून आणली. त्यांनी दुकानांवर हल्ले केले आणि अमरावतीतील लघुउद्योग जबरदस्तीने बंद पाडले, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Nov 18, 2021, 11:27 PM IST

चंद्रपूर -इतर राज्यात घडलेल्या घटनेवरून अमरावती,(Amravati Violence) नांदेड, मालेगाव येथे दंगली उसळल्या. या दंगलींमध्ये काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा सहभाग होता. पोलीस तपास करतील आणि सत्य बाहेर येईल. पण या दंगलींना प्रत्युत्तर म्हणून देशावर राज्य करणाऱ्या पक्षाच्या विचारसरणीच्या लोकांनी आणखी एक प्रकारची दंगल घडवून आणली. त्यांनी दुकानांवर हल्ले केले आणि अमरावतीतील लघुउद्योग जबरदस्तीने बंद पाडले, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) यांनी केले आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

शरद पवार यांचे विधान
शरद पवार यांचे विधान

ABOUT THE AUTHOR

...view details