महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७ जणांवर तडीपारीची कारवाई - Chandrapur Assembly Election News

चिमूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सात व्यक्तींना तडीपार केले आहे.

प्रशासकीय इमारत

By

Published : Oct 18, 2019, 10:56 AM IST

Updated : Oct 18, 2019, 12:20 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय केल्या जात आहेत. चिमूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सात व्यक्तींना तडीपार केले आहे.

ब्रम्हपुरी आणि चिमूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अवहावालानुसार ही तडीपारीची कारवाई करण्यात आली. सातजणांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील चार व चिमूर तालुक्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा - अमरावतीत चांदूर रेल्वे बायपास चेक पोस्टवर ७ लाखांची रोकड जप्त

चिमूर विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार सिंदेवाही येथील राहुल नारायण कंकटवार, मयुर देवकुमार भैसारे, राजु नारायण केसरवार, गौतम सुर्यभान जनबंधु, रखमाबाई विठोबा सोनवणे, सुरेश सहदेव खोब्रागडे आणि राजकुमार उर्फ मोगली हरीभाऊ चाचरकर या सातजणांना निवडणूक अधिकाऱ्यांनी हदपारीचे आदेश बजावले आहेत.

Last Updated : Oct 18, 2019, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details