महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेच्या मतदान ओळखपत्रावर मृत व्यक्तीचा फोटो; निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार - chandrapur

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यातील धाबा येथील मंगला नरेंद्र मुंगले या महीलेला देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रात नाव त्यात महिलेचे परंतू फोटो चक्क मृत व्यक्तीचा आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्रांमध्ये झालेला बोंगळ कारभार समोर आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मतदार ओळखपत्रामध्ये भोंगळ कारभार

By

Published : Oct 16, 2019, 10:22 PM IST

चंद्रपुर - विधानसभा निवडणूकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान निवडणूक आयोग करत आहे. शासनामार्फत प्रत्येक मतदारांना घरपोच मतदार ओळखपत्राची छायांकित प्रत पोहचवली जात आहे. मात्र, या पावत्यांमध्ये अनेक चुका आढळून येत आहेत. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मतदार ओळखपत्रामध्ये भोंगळ कारभार

हेही वाचा -काँग्रेसचे काम मी तळागळापर्यंत नेले, म्हणून विजय निश्चित - सुभाष धोटे

राजुरा विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पेटलेली आहे. आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. बुथस्तरावरील एक एक कार्यकर्ता जुळविण्याकरिता कंबर कसल्या जात आहे. शासनाकडुन प्रत्येक मतदाराचे घर गाठून मतदार ओळखपत्राची छायांकित प्रत दिल्या जात आहे. मात्र, मतदारांना दिल्या जाणाऱ्या पावत्यांमध्ये अनेक चुका आढळून येत आहेत. जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यातील धाबा येथील मंगला नरेंद्र मुंगले या महीलेला देण्यात आलेल्या मतदार ओळखपत्रात नाव त्यात महिलेचे परंतू फोटो चक्क मृत व्यक्तीचा आहे. त्यामुळे मतदार ओळखपत्रांमध्ये झालेला बोंगळ कारभार समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details