महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांची चंद्रपुरात बदली - ठाणे पोलीस बातमी

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी चंद्रपूर येथे बदली झाली आहे.

नितीन ठाकरे
नितीन ठाकरे

By

Published : May 12, 2021, 8:12 PM IST

Updated : May 12, 2021, 8:52 PM IST

ठाणे -ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची चंद्रपूर येथे बदली झाली आहे. मंगळवारी (दि. 11 मे) ठाकरे हे ठाणेकरांना अलविदा करत चंद्रपूरला रवाना झाले. यावेळी त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्प वर्षाव करत त्यांना निरोप दिला. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.

अलविदा करताना

ठाणे शहर हे मेगासिटी आणि देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या बाजूला असलेले एक शहर, या शहरात गुन्हे शाखा एकच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी 2017 मध्ये नितीन ठाकरे रुजू झाले. एकापेक्षा एक धडाकेबाज कारवाई करून गुन्हे शाखेचा गुन्ह्यांची उखल करण्यात एक उच्चांक प्रस्थापित केला. प्रेमळ, कायद्याचे चांगले ज्ञान, संयमी आणि जनमानसाशी चांगले संबंध आणि दांडगा जनसंपर्क हे नितीन ठाकरे यांची खास वैशिष्ट्ये आहेत. 2017 पासून गुन्हे शाखेत कार्यरत झालेले नितीन ठाकरे यांची प्रशासकीय बदली एप्रिल, 2021च्या अखेरीस झाली.

नितीन ठाकरे यांनी धडाकेबाज कारवाई करत अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. अनेक प्रकरणातून आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. वेळप्रसंगी महिना-महिना परराज्यात पथकासह ठाण मांडून कामगिरी यशस्वी करत होते. लाभला. यामुळे त्यांच्यात व त्यांच्या पथकामध्ये कौटुंबिक नाते तयार झाले. याच नात्याला बदलीच्या स्वरूपात अलविदा करताना पथकातील अनेकांनी भावूक होत त्यांना निरोप दिला तर काहींनी हसतमुखाने त्यांना निरोप दिला.

2016 मध्ये केलेली कारवाई

  • अमेरिकन नागरिकांना गंडा घालणारे बोगस कॉलसेंटर उध्वस्त
  • जेष्ठांच्या केअरटेकर हत्यातील आरोपी जेरबंद
  • डायघरमध्ये दाम्पत्याची हत्यातील फरारी आरोपी जेरबंद
  • मुंब्रा दुहेरी हत्याकांड आणि मृतदेह पुरणाऱ्या आरोपींना अटक
  • मुंब्रा येथील व्यापाऱ्याचे नेपाळ बॉर्डरवर अपहरण-माओवादी प्रमुखासह तिघांना अटक व व्यापाऱ्याची सुटका
  • मणिपूरम 30 किलो सोने चोरीचा पर्दाफाश- मुख्य आरोपीला धावत्या रेल्वेतून अटक
  • सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीचा पर्दाफाश आणि अटकसत्र

2017 मध्ये गुन्हे शाखा एकने उघडकीस आणलेले गुन्हे

  • गाजलेले आर्मी पेपर फुटीची प्रकरण
  • लहान मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद
  • गॅसकटिंग करून बँकेत चोऱ्या करणाऱ्या अंतरराजीय टोळी जेरबंद
  • चिपद्वारे नागरिकांचे पेट्रोल समोरच चोरणाऱ्या पेट्रोल पंप, धंद्यात सक्रिय पेट्रोलपंप मालक, टेक्नेशियन आणि या चोरीसाठी आवश्यक चिप बनविणारा मास्टरमाइंड जेरबंद
  • अवजड ट्रक लांबविणारी टोळीला अटक
  • महामार्गावर शस्त्राच्या धाकावर परराज्यातील ट्रक चालकांना लुटणाऱ्या सराईत टोळीला अटक
  • बनावट ऑईल बनवणारी कंपनीचा पर्दाफाश
  • भर दिवसा व रात्री घरफोडी करणारे आरोपी जेरबंद
  • बिबट्याची कातडी व सांबारचे शिंगे विकणारे आरोपी जेरबंद
  • बेकायदेशीरपणे जिलीटेन व इलेक्ट्रॉनिक डिटोनेर विकणाऱ्या आरोपींना अटक
  • भारतीय चलनातली बनावट नोटा विकणारे आरोपींना अटक
  • इलेक्ट्रिक ट्रान्सफरमधील लाखोंचे तांबा विकणारे आरोपी गजाआड
  • शासनाला चुना लावणाऱ्या सी फॉर्म बनवून विकणाऱ्या टोळीला अटक
  • नोकरीचे अमिषा देत गंडा घालणारी टोळी जेरबंद
  • विविध राज्यातील गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींना ठाण्यातून शोधून अटक
  • गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपींना अटक
  • सारखे अमली पदार्थ तस्करांना अटक लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • डोंबिवलीतील बोगस डॉक्टर दाम्पत्याला अटक
  • बोगस कॉलसेंटर मास्टरमाईंड सागर ठक्करला अटक
  • शिपिंग-नेव्ही भरतीसाठी बनावट सीडीसी बनविणारी टोळीचा बिमोड
  • मुंब्रा-दिवा खाडीत देशीदारु भट्टी उध्वस्त लाखो रुपयांचे केमिकल व कच्चा माल केला नष्ट
  • भारतीय चलनातून रद्द झालेल्या 4 कोटी रुपयां 500 व हजाराच्या नोटा जप्त
  • बांगलादेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • ज्वेलर्स दरोडा टाकणारे टोळीला अटक - रिव्हॉल्व्हर, पिस्तूल सारखे घातक हत्यारे जप्त

2018 वर्षातील शाखा एकची धडक कारवाई

  • सिव्हिलमधून नवजात बालकाचे अपहरण-१२ तासात एका महिलेसह तिघे गजाआड
  • अकोल्यातून ६ किलो सोने चोरी-सर्व आरोपीना गजाआड केले
  • प्रेमप्रकरण-प्रेयसीच्या पित्याकडून प्रियकराची हत्या-सर्व आरोपी गजाआड
  • 1998 मध्ये नारपोली भिवंडीत हत्या-१० वर्षानंतर आरोपी जेरबंद
  • सीडीआर प्रकरण-देशातील पहिली महिला प्राइवेट डिटेक्टिव रंजनी पंडितला अटक
  • 10 पिस्तुल, 40 जिवंत काडतूसासह हत्यार तस्कर गजाआड
  • मुंब्रा येथील दोन वर्षाच्या बालकाचे अपहरण-अपहरण करणाऱ्या कामवालीला 18 तासात अटक
  • व्हेल माशाच्या उलटीपासून बनविलेला पदार्थ तस्कर आरोपीना अटक
  • मांडूळ साप तस्कर, जिवंत पगोलिन, त्याचे चामडे, बिबट्याचे कातडे तस्कर आरोपींना ठोकल्या बेड्या
  • 2 हजार 910 देशी बॉम्बसह आरोपींना अटक
  • नोकरीचे आमिषा दाखवत तरुणाची फसवणूक प्रकरणी एकास अटक
  • जन्मठेप बिहारचे जेल तोडून फरार आरोपीला अटक
  • 20 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना संपूर्ण दुचाकींसह अटक
  • दुकान-घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक-12 गुन्ह्यांची उकल
  • वर्च्युअल करेन्सी धोखाधडी-लाखोची मालमत्ता जप्त
  • ठाण्यातील 6 अपहरण प्रकरणातील आरोपी गजाआड

विविध गुन्ह्यात पथकाने एका वर्षात तब्बल 24 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करून सील केली. तर अनेक गंभीर गुन्ह्यात ठाण्यात ओळख लपवून बसलेल्या आरोपींना अटक केली. तसेच ठाण्यात गुन्हे करून उत्तर प्रदेशात लपलेल्या अनेक आरोपींच्या मुसक्या अवलाण्याची धडक कारवाई केली.

हेही वाचा -शरीरसंबंधास नकार दिल्याने पत्नीची हत्या, २ वर्षांचा चिमुकला झोपला होता आईच्या मृतदेहावर

Last Updated : May 12, 2021, 8:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details