चंद्रपूर - भरधाव दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. राजूरा तालुक्यातील नलफडी सिंधी मार्गावर ही घटना घडली. लिंगु मेश्राम असे मृत व्यक्तीचे नाव असून ते धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.
ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात; मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू - Rajura Accident
राजूरा तालुक्यात झालेल्या दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात दुचाकास्वार जागीच ठार झाला. लिंगु मेश्राम असे मृत व्यक्तीचे नाव असून ते धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते.

मुख्याध्यापकाचा अपघातात मृत्यू
हेही वाचा -कोरोना इफेक्ट : रास्त भाव दुकानात ग्राहकाना करावा लागणार नाही अंगठा
मृत मुख्याध्यापक लिंगु मेश्राम हे नेहमीप्रमाणे नलफडी-सिंधी मार्गाने शाळेला जात होते. नलफडीपासून काही अंतरावर मेश्राम यांच्या दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विरुर पोलीस करत आहेत.