महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात संभाजी ब्रिगेडचे घंटानाद आंदोलन

प्रामुख्याने शेतकऱ्याला पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्यात यावे, रासायनिक खतांची भाववाढ कमी करावी, 2024 पर्यंत शेतकऱ्याला विजबिलात सूट द्यावी, मुख्य नदीवर बंधारे बांधून सिंचनाची सुविधा करून द्यावी या मुख्य मागण्या आहेत.

By

Published : Jun 11, 2019, 10:23 AM IST

शेतकऱ्याच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे घंटानाद आंदोलन

चंद्रपूर- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरली आहे. या माध्यमातून संपूर्ण राज्यात आंदोलन उभारण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर शहरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्याच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडचे घंटानाद आंदोलन

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ संभाजी ब्रिगेडच्या एकूण 24 मागण्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्यात यावे, रासायनिक खतांची भाववाढ कमी करावी, 2024 पर्यंत शेतकऱ्याला विजबिलात सूट द्यावी, मुख्य नदीवर बंधारे बांधून सिंचनाची सुविधा करून द्यावी, गाय पाळण्यासाठी शेतकऱ्याला गोपालन भत्ता द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, चंद्रशेखर झाडे, विवेक बोरीकर आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details