महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'दारू तीच फक्त बाटली बदलली; शेतकरी नेते ॲड. चटप यांची भाजपवर टीका

राजूरा विधानसभा मतदारसंघाचे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात धाबा या गावातून केली. यावेळी त्यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

अॅड. वामनराव चटप

By

Published : Oct 11, 2019, 11:53 AM IST

चंद्रपूर - सत्ताधारी भाजप सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र, आश्वासनांची पूर्तता केली नाही. सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहेत. काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या झाल्या, मात्र, भाजपच्या काळातही आत्महत्यांचा आकडा कमी झालेला नाही. भाजप सरकार म्हणजे 'दारू तिच केवळ बाटली बदलली' अशी टीका राजूरा विधानसभा मतदारसंघाचे स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी केली. ते धाबा येथील प्रचार सभेत बोलत होते.

शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांची भाजपवर टीका

हेही वाचा - शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? - अमित शाह

राजूरा मतदारसंघात निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारांच्या गावभेटीला वेग आला आहे. शेतकरी संघटना समर्थित, स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा येथे प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारसभेतून चटप यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलेच झोडले. सरकारला जाब विचारण्यास विरोधक अपयशी ठरले आहेत. तसेच फडणवीस सरकार खोटारड्यांची फौज असल्याची बोचरी टीका चटप यांनी केली.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपूरचा रंजना मामर्डे, शशिकांत देशकर, सतिष दाणी, राजेश कवटे, तुकेश वानोडे मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा - गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details