महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवृत्ती नंतरही कर्मचाऱ्याची कोरोना जनजागृतीची सेवा; लाऊड स्पीकर लावून करतोय जनजागृती - awareness about corona

रमेश नारायणराव चन्ने हे राजुरा तहसील कार्यालयात शिपाई पदावरून ऑक्टोबर 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेत. आत्तापर्यंत ते आपल्या घरी निवांतपणे वेळ घालवीत होते. मात्र, कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि सारे काही ठप्प झाले. अशावेळी रमेश चन्ने स्वस्थ कसे बसणार, त्यांनी आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना जनजागृती करण्याच्या कामाकरता परवानगी मागितली.

निवृत्ती नंतरही कर्मचाऱ्याची कोरोना जनजागृतीची सेवा
निवृत्ती नंतरही कर्मचाऱ्याची कोरोना जनजागृतीची सेवा

By

Published : Apr 21, 2020, 10:17 AM IST

चंद्रपूर - सेवानिवृत्ती म्हणजे थकलेल्या शरीराला विश्रांती द्यायची वेळ, कुटुंबातील सदस्यांसोबत मनसोक्त वेळ घालविण्याची संधी. मात्र, अशावेळी एक सेवानिवृत्त कर्मचारी घरी स्वस्थ न बसता कोरोनाची जनजागृती करण्यात व्यस्त आहे. राजुरा येथील शहरात ते दररोज लाऊडस्पीकर घेऊन लोकांना कोरोनाबाबत जागृत करत आहेत.

निवृत्ती नंतरही कर्मचाऱ्याची कोरोना जनजागृतीची सेवा

रमेश नारायणराव चन्ने हे राजुरा तहसील कार्यालयात शिपाई पदावरुन ऑक्टोबर 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेत. आत्तापर्यंत ते आपल्या घरी निवांतपणे वेळ घालवीत होते. मात्र, कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि सारे काही ठप्प झाले. अशावेळी रमेश चन्ने स्वस्थ कसे बसणार, त्यांनी आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना जनजागृती करण्याच्या कामाकरता परवानगी मागितली.

आधीच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या चन्ने यांना अधिकाऱ्यांनी त्वरित परवानगी दिली. तेव्हापासून चन्ने राजुरा शहरात जनजागृती करत आहेत. हातात लाऊडस्पीकर घेऊन ते शहरात फिरतात. सोशल डिस्टन्सिंग पाळा, साबणाने हात स्वच्छ धुवा, विनाकारण घराबाहेर पडू नका अशा सूचना ते या माध्यमातून देत असतात. सकाळी १० वाजल्यापासून ते घराबाहेर पडतात. शहरातील बँका, भाजीपाला मार्केट, दुकाने या ठिकाणी जाऊन भोंगा वाजवून ते लोकांना जागृत करताहेत. निवृत्त झाल्यानंतर या वयातही ते समाजासाठी झटत आहेत, याचे त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कौतुक आहे.

चन्ने यांच्या जीवनावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांचे आजोबा, वडील चिमूर येथील क्रांती आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे आपल्यावर असलेल्या सामाजिक जबाबदारीचे आपण निर्वाहन करीत आहोत, अशी प्रतिक्रिया रमेश चन्ने यांनी यावेळी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details