महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर महानगरपालिका; महापौरपदी राखी कंचर्लावार तर उपमहापौरपदी राहुल पावडे - mayor of cvhandrapur

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून महापौर व उपमहापौरपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महापौरपदी भाजपच्या राखी कंचर्लावार तर उपमहापौरपदी राहुल पावडे निवडून आले आहेत.

chandrapur

By

Published : Nov 22, 2019, 6:17 PM IST

चंद्रपूर- चंद्रपूर महानगरपालिकेच्या पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली. महापौरपदी भाजपच्या राखी कंचर्लावार तर उपमहापौरपदी राहुल पावडे निवडून आले आहेत.

प्रतिक्रिया देताना महापौर राखी कंचर्लावार


राखी कंचर्लावार यांना 42 तर त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार कल्पना लहामगे यांना 22 मते मिळाली. उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल पावडे यांना 42 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे उमेदवार अशोक नागपूरे यांना 22 मते मिळाली.


यापूर्वी महापौर पदावर भाजपच्याच अंजली घोटेकर तर उपमहापौरपदी अनिल फुलझेले हे कार्यरत होते. महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे दुसऱ्या वेळीही महापौरपद आणि उपमहापौरपदी भाजपचाच उमेदवार बसेल हे जवळपास निश्चित होते. ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला. कंचर्लावार ह्या दुसऱ्यांदा महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details