चंद्रपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगर परिषदेने हँड वॉश स्टेशन उभारले आहे. या स्टेशनमधून फुट पॅडेलला प्रेस करून हँडवॉश आणि पाणी नागरिक घेऊ शकतात. हे अत्याधुनिक स्टेशन शहरातील सार्वजनिक स्थळी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून, किमान 20 सेकंद तरी नागरिकांनी हात हँड वॉश लिक्वीडने धुवावे याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. मात्र, पारंपरिक पद्धतीने हात धुताना आपल्याला वारंवार हँडवॉश आणि नळाला स्पर्श करावा लागतो. यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून, नगर परिषदेमार्फत हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आले आहे.
राजुरा नगरपालिकेचा भन्नाट उपक्रम; नागरिकांच्या सेवेत ऑटोमॅटिक 'हँड वॉश स्टेशन'
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून, किमान 20 सेकंद तरी नागरिकांनी हात हँडवॉश लिक्वीडने धुवावे, याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत.
नागरिकांना कुठेही हाताने स्पर्श न करता फूट पॅडेलच्या सहाय्याने पॅडेलवर दाब देऊन हँडवॉश लिक्वीड आणि पाणी दोन्ही वस्तू घेऊ शकतात. कुठलाही हाताचा स्पर्श न करता आपले हात स्वच्छ धुता येणार आहेत. हे अत्याधुनिक हँडवॉश स्टेशन नगर परिषद राजूरामार्फत शहरातील सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध आहे. शहरातील बँक, पंचायत समिती चौक, आठवडी बाजार परिसर, पोलीस स्टेशन परिसरात गर्दी असते. त्यामुळे या परिसरात स्टेशन उभारण्यात आले आहे.
यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी अर्शिया जुही, उपाध्यक्ष सुनील देशपांडे आणि आरोग्य समिती सभापती वज्रमाला बतकमवार तसेच सर्व सभापती आणि नगरसेवक यांनी नागरिकांना सदर हँड वॉश स्टेशनचा वापर करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करण्याबाबत आवाहन केले आहे. तसेच सर्वांना शासनाचा मार्गदर्शक सूचनेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याबाबत विनंती केली आहे.