चंद्रपूर :चंद्रपूरातल्या बल्लारशा रेल्वे स्टेशनवर फुटओव्हरचा ब्रिज ( Footover bridge collapsed ) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २ गंभीर जखमी आहेत. झाल्याचे सांगण्यात येत ( Footover bridge collapsed at Ballarasha railway station ) आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर फूटओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. यावेळी अनेक प्रवासी पुलावरून खाली पडले. या अपघातात दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचेे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. या घटनेतील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिले आहे.
चंद्रपुरात रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळला फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला -चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रविवारी मोठा अपघात झाला. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. या पुलाची उंची सुमारे 60 फूट होती. अपघाताच्या वेळी अनेक प्रवासी तेथून जात होते. पुलाचा काही भाग तुटल्याने प्रवासी रेल्वे रुळावरून 60 फूट खाली पडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर.2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली.
जखमीना मदत जाहीर -रेल्वेने गंभीर जखमींना 1 लाख रुपये, साध्या जखमींना 50 रुपये देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी इतर रुग्णालयात हलवून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणा -काझीपेठ ट्रेन येत असताना या पुलावर अनेक प्रवासी जमले होते, याच दरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे हा पूल जीर्ण झाला होता. मात्र, नव्या पुलाचे काम अजून पूर्ण झालेले नव्हते, त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकात झालेली दुर्घटना दुःखद व दुर्दैवी आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचे, जखमींवर वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मदतकार्य सुरू - फूटओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळल्यानंतर मदतकार्य सुरू आहे. सध्या कोणत्याही प्रवाशाच्या मृत्यूचे वृत्त नाही. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर अनेक प्रवासी काझीपेट पुणे एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जात होते. दरम्यान, अचानक फूटओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. ही घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
ब्रिज दुर्घटनेत जखमी झालेल्या 9 जणांची नावे समोर - फुटओव्हर ब्रिज दुर्घटनेत जखमी झालेल्या 13 जणांची नावे समोर आली आहेत. जखमींचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी फुटओव्हर ब्रिज दुर्घटनेबाबत सीपीआरओ सीआर शिवाजी सुतार यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी ५.१० वाजता नागपूर विभागातील बल्हारशाह येथे फूट ओव्हरब्रिजच्या स्लॅबचा काही भाग पडला.
जखमींना घेऊन जातांना नागरिक
या घटनेत अनेक जण जखमी झाले असून सर्वांना प्राथमिक उपचारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. यामध्ये रंजना खडतड, छाया भगत, नीलिमा रंगारी, साची पाटील, निधी भगत, चैतन्य भगत, अंजली वर्मा, प्रिया खडतड, अनुराग खडतड यांचा समावेश आहे. यापैकी नीलिमा रंगारी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन जण हे गंभीर आहेत. या दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाने मदत जाहीर केली असून या अपघाताची चौकशी देखील होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.