१०० खाटांच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्या; खासदार-आमदार धानोरकर दाम्पत्याचे महसूलमंत्र्यांकडे साकडे
उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांवरून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. १०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाकरिता ४. ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी खासदारबाळू धानोरकर व त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर या दाम्पत्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर - वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे होते. परंतु वरोरा हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. येथील लोकांना योग्य उपचार होण्याकरिता तत्कालीन आमदार बाळू धानोरकर यांनी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. यामध्ये शासनाने देखील हे रुग्णालय मंजूर केले. परंतु सद्या ५० खाटांचे रुग्णालय अपुऱ्या जागेत असल्याने १०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाकरिता ४. ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे ५० खाटांवरून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन झाले आहे. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालय वरोरा शहरातील मुख्य रोडवर कार्यान्वित आहे. सदर रुग्णायलासमोर २५० फुटांवर तलाव आहे. तलावाच्या बाजूला उतारावर उपजिल्हा रुग्णालयाची इमारत आहे. त्यामुळे इमारतीला ठिकठिकाणी तडे जाऊन भेगा पडलेल्या आहे. त्यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी उपजिल्हा रुग्णालय हे नगर परिषद अंतर्गत रुग्णालय होते व त्याकरिता १७०० स्क्वेअर मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु हि जागा अपुरी पडत आहे. १०० खाटांच्या रुग्णालयाचा बांधकामाकरिता प्रशस्त जागा असणे आवश्यक आहे.
वरोरा शहराची नागरिकांना उपचाराकरिता येथील रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूर येथील आरोग्य सेवेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सामान्य जनतेला होऊ नये याकरिता खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नागरिकांच्या हिता करिता व त्यांच्या त्रास कमी होण्याकरीता १०० खाटांच्या रुग्णालयाचा बांधकामाकरिता ४. ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी धानोरकर दाम्पत्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. यामुळे वरोरा शहरातील आरोग्य सेवा ही सक्षम होऊ शकेल व नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.