महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पांचसो में बिक जाओगे तो ऐसाही रोड पाओगे'; चंद्रपुरातील खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन

'500 में बिक जाओगे, ऐसाही रोड पाओगे, "जात पात बघाल तर गड्यात फसाल", 'कुठे नेऊन ठेवला चंद्रपुर माझा" असे नारे लावत आंदोलन करण्यात आले.

खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन
खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन

By

Published : Aug 21, 2021, 10:42 PM IST

चंद्रपूर - शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. अनेक कामांसाठी रस्ते खोदण्यात आले असून,ते निकृष्ट दर्जाचे आहेत. अशावेळी या रस्त्यावरून प्रवास करताना चंद्रपुरकरांच्या नाकीनऊ येत आहे. याचा रोष व्यक्त करण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. पैशांच्या आमिषाला बळी पडून मतदान कराल तर असेच रस्ते मिळतील अशी नारेबाजी करीत रस्त्यावर आंदोलन करण्यात आले.

खड्डेमय रस्त्यांवर अनोखे आंदोलन
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी अमृत योजनेचे काम सध्या शहरात सुरू आहे. याची पाईपलाईन टाकण्यासाठी शहरातील रस्ते जागोजागी फोडण्यात आले आहेत. मात्र हे खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाहीत. सोबतच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचाही प्रश्न ऐरणीवर आहे. तयार केलेले रस्ते अवघ्या काही महिन्यांत उखडून गेले. अशा रस्त्यांची महापालिकेकडून वेळेवर डागडुजी करण्यात येत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्याची स्थिती आणखी वाईट होत आहेत. शहरातील या स्थितीबाबत संताप व्यक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पैशांच्या आमिषाला बळी पडून जर चुकीच्या व्यक्तीला निवडून द्याल तर असेच खड्डे बघायला मिळणार.

अनोखे नारे

'500 में बिक जाओगे, ऐसाही रोड पाओगे, "जात पात बघाल तर गड्यात फसाल", 'कुठे नेऊन ठेवला चंद्रपुर माझा" असे नारे लावत आंदोलन करण्यात आले. महाकाली मंदिर परिसरातून सुरुवात करत, बागला चौक, समता चौक, आंबेडकर चौक आणि बंगाली कैम्प परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आसिफ सय्यद, सचिन वाघमारे, डॉ. देबोश्री बार, सुमित शुक्ला, रोहित गोगोई यांनी सहभाग नोंदवला. जर रस्त्यांची डागडुजी वेळेत करण्यात आली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचा -एकनाथ शिंदे मंत्री असले तरी ते सही पुरतेच, नारायण राणेंची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details