नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात जनसमुदाय रस्त्यावर; त्वरित कायदा रद्द करण्याची मागणी
हा कायदा संविधानाच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आहे. नागरिकांना आपसात विभाजित करणारा आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चंद्रपूर -नागरी संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत असताना चंद्रपुरातही याचे पडसाद उमटले. आज या कायद्याविरोधात हजारोंच्या संख्यने जनसमुदाय रस्त्यावर उतरला ज्यात मुस्लिम, ओबीसी, एससी वर्गातील नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. हा कायदा देशासाठी अत्यंत घातक असून संविधानाच्या मुळंतत्वाना छेद देणारा आहे, नागरिकांना आपसात विभाजित करणारा आहे, त्यामुळे हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.