महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Milk Production: दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना; जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक - मक्कापासून मुरघास चारा

जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. तसेच दुधाच्या उत्पादनात घट होताना दिसते. म्हणूनच कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्कापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला आहे.

Milk Production
दूध उत्पादन वाढीसाठी चालना

By

Published : Apr 27, 2023, 10:49 PM IST

चंद्रपूर : जनावरांना रानात चराईबंदी असल्याने त्यांना पौष्टिक चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या या युगात सर्वच जनावरांना घरच्या घरी चारावे लागते. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत आहे. त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. चराई क्षेत्र नाही, पौष्टिक चारा नाही. परिणामी दुधाळू जनावरांना समतोल आहार मिळत नसल्याने, दुधाच्या उत्पादनात घट होताना दिसते. म्हणूनच कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्कापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला.



जिल्हाधिकारी प्रात्यक्षिक बघितले:मौजा अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरवळकर उपस्थित होते.


मुरघास चारा दुधाळू जनावरासाठी एक वरदान:मक्यापासून बनविलेले मुरघास जनावरे मोठ्या चवीने खतात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. तसेच मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. मुरघास चा-यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच तसेच शेतक-यांनासुध्दा एक पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा.

गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी: तसेच यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्री. बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते. तर दुधाचे दर वाढण्यामागे चारा टंचाई आणि महागाई हे कारण आहे.गव्हाचा उपयोग गुरांसाठी चारा म्हणून केला जातो. मात्र गव्हाची निर्यात वाढल्याने पुरेशा स्वरूपात चारा उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे.

हेही वाचा: World Year of Cereals 2023 ज्वारीबाजरी गहूमक्याचा असाही सन्मान वाचा शेतकऱ्यांसाठी सरकारने काय घेतला निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details