चंद्रपूर - पर्यावरण संवर्धनासाठी ( Save the Environment ) एका ध्येयवेड्या आयआयटीच्या प्राध्यापकाने संकल्प घेतला आहे. यासाठी ते भारत भ्रमंतीवर निघाले असून तब्बल 11 वर्षे अविरत ते प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी आपल्या घराचा त्याग केला असून 2030 पर्यंत ते आपल्या घरी जाणार नाहीत. एका मोठ्या बसमध्येच त्यांनी आपले घर तयार केले आहे. प्रा. चेतन सोलंकी ( Professor Chetan Solanki ), असे या आयआयटीच्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्रवासादरम्यान ते चंद्रपुरात आले असता त्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बातचीत केली.
असा घेतला कुटुंबाला सोडण्याचा निर्णय -पर्यावरणाची समस्या आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ ( Worlds Temperature is Increase ) झाली आहे. कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण टोकावर गेले आहे. प्रयत्न करण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्या गरजा मर्यादित ठेऊन शाश्वत विकासाची कास धरणे आवश्यक आहे. सौरऊर्जा हा यातील सर्वात महत्वाचा विकल्प आहे. ही गोष्ट प्रा. चेतन सोलंकी यांच्या लक्षात आली असून हा संदेश देशातील सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. आपले घर त्यागून यासाठी भारतभर जनजागृती करण्यासाठी ते निघाले आहेत. मात्र, यासाठी सुरुवातीला त्यांच्या पत्नीचा विरोध होता, आईवडिलांनाही संकोच होता. मात्र, त्यांनी आपली भूमिका आणि त्याचे महत्व पटवून दिले आणि सर्वांनी जड अंतकरणातून याला संमती दिली. 2030 पर्यंत ते आपल्या घरी पाय ठेवणार नाहीत.
असा सुरू झाला प्रवास -प्रा. सोलंकी हे आयआयटी मुंबईचे ( Indian Institute of Technology Bombay ) प्राध्यापक असून ते मूळचे मध्यप्रदेशच्या भोपाळचे रहिवासी आहेत. 26 नोव्हेंबर, 2020 म्हणजे संविधान दिनाच्या दिवशी त्यांनी आपल्या यात्रेची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमामुळे प्रभावित होऊन किरण जायभय, प्रशांत मिश्रा, प्रकाश इसवे, चालक गजानन चव्हाण हे त्यांच्यासोबत जुळले, जे नेहमी त्यांच्या सोबत प्रवास करतात. या माध्यमातून त्यांनी मध्यप्रदेश ( Madhya Pradesh ), गुजरात ( Gujrat ), महाराष्ट्र ( Maharashtra ) भ्रमंती केली. ठिकठिकाणी जाऊन सोलंकी या संदर्भात लोकांना भेटतात. त्यांना हे पर्यावरण नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर कसे उभे आहे यावर आपली अभ्यासपूर्ण मांडणी करतात. 2030 पर्यंत आठ ते दहावेळा ते भारत भ्रमंती करणार ( Traveling around India ) आहेत. स्वराज फाउंडेशनच्या ( Swaraj Foundation ) माध्यमातून हे काम ते करत आहेत.
अशी आहे त्यांची बस -ज्या बसमध्ये प्रा. सोलंकी फिरत आहे, ती केवळ बस नसून चालते फिरते घर आहे. यात किचन, बेडरूम, बाथरूम अशी सर्व व्यवस्था आहे. त्यात एसी, टीव्ही, पंखा, शॉवर, चार्जिंग अशा सर्व सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी सौर ऊर्जेवर ( Solar Energy ) चालतात. यासाठी बसवर त्यांनी सोलर पॅनेल ( Solar Panel ) लावून घेतले आहे. प्रत्येक ठिकाणी बस जाऊ शकत नाही. त्यामुळे बसमध्ये त्यांनी एक सायकलही आहे जी इलेक्ट्रिक ( Electric Cycle ) आहे.