महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Professor Booked Jhund Show : असेही एक प्राध्यापक! विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून 150 जणांना स्वखर्चाने दाखवला 'झुंड'

चांगली पुस्तके ज्याप्रमाणे मानवी जीवनाला प्रेरणा देतात. त्याचप्रमाणे चांगले चित्रपट देखील एखाद्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवू शकतात. 'स्वदेश' सारखा चित्रपट बघून बाहेर देशातील नोकरी सोडून काहीतरी चांगले करण्यासाठी अनेक युवक देशात परतले. 'चक दे इंडिया' आल्यावर राष्ट्रीय खेळ हॉकी आणि अशा खेळाडूंबाबत जागरूकता निर्माण झाली. त्याप्रमाणे नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट ( Nagraj Manjule Jhund movie ) रिलीज झाला असून त्या माध्यमातून 'नाहिरे' वर्गाचे वास्तविक जीवन प्रेरणादायीरित्या चितारले आहे असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राजेश पेचे यांनी सांगितले.

Professor Booked Jhund Show
नागराज मंजुळेंचा झुंड स्वखर्चांने दाखवला

By

Published : Mar 14, 2022, 1:09 PM IST

Updated : Mar 14, 2022, 3:11 PM IST

चंद्रपूर - नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट ( Nagraj Manjule Jhund movie ) रिलीज झाला असून त्या माध्यमातून 'नाहिरे' वर्गाचे वास्तविक जीवन प्रेरणादायीरित्या चितारले आहे. अनेकांना हा चित्रपट प्रभावित करीत आहे. हा चित्रपट बघून कमालीचे प्रभावित झालेल्या एका प्राध्यापकाने आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दीडशे विद्यार्थ्यांना स्वखर्चाने हा चित्रपट दाखवला. प्रा. राजेश पेचे असे त्यांचे नाव असून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहे.

प्रतिक्रिया

जीवनाला प्रेरणा देणाऱ्या चित्रपटापैकी एक 'झुंड' -

चांगली पुस्तके ज्याप्रमाणे मानवी जीवनाला प्रेरणा देतात. त्याचप्रमाणे चांगले चित्रपट देखील एखाद्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवू शकतात. 'स्वदेश' सारखा चित्रपट बघून बाहेर देशातील नोकरी सोडून काहीतरी चांगले करण्यासाठी अनेक युवक देशात परतले. 'चक दे इंडिया' आल्यावर राष्ट्रीय खेळ हॉकी आणि अशा खेळाडूंबाबत जागरूकता निर्माण झाली. 'सैराट' सारख्या चित्रपटाने सामाजिक विषमतेच्या जीवघेण्या दरीबाबत समाजाला आत्मचिंतन करायला भाग पाडले. नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' चित्रपटाने देखील अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे. झोपडपट्टीतील दुर्लक्षित वर्गाच्या व्यथा, त्यांचे जीवन दाखवल्या आहेत. त्यांच्या जीवनात अचानक एक प्राध्यापक येतो आणि यामुळे त्यांचे जीवनाचा कसा कायापालट होतो यावर हा चित्रपट भाष्य करतो.

दीडशे विद्यार्थ्यांसाठी केला झुंड चित्रपटाचा शो बुक -

झुंड हा चित्रपट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्थापत्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राजेश पेचे यांनी बघितला. हे बघून ते कमालीचे प्रभावित झाले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येणारे विद्यार्थी देखील अत्यंत साधारण कुटुंबातील असतात. ग्रामीण भागातील आलेल्या विद्यार्थ्यांत अनेक बाबतीत न्यूनगंड असतो. ही बाब स्वतः प्राध्यापक राहून पेचे यांनी अनुभवली आहे. तसेच ज्या वर्गावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांच्या व्यथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने त्यांनी आपल्या विभागातील तब्बल दीडशे विद्यार्थ्यांसाठी झुंड चित्रपटाचा शो बुक केला. जर आर्थिक क्षमता असती तर महाविद्यालयातील संपूर्ण दीड हजार विद्यार्थ्यांसाठी आपण हा शो दाखवण्याची आपली इच्छा आहे. मात्र, आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण दीडशे मुलांच्या तिकिटांचा खर्च उचलू शकलो याचे आपल्याला समाधान असल्याचे प्रा. पेचे सांगतात.

विद्यार्थी चित्रपट पाहून भारावले -

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना देखील हा चित्रपट कमालीचा आवडला. हा चित्रपट बघून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला असे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रा. पेचे हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच काहीतरी आगळेवेगळे करीत असतात. विद्यार्थ्यांच्या आत दडलेल्या क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जमेल ती मदत करतात. यासाठी ते महाविद्यालयात परिचित आहेत. झुंड चित्रपटाचे कथानक वास्तविक जीवनावर बेतलेले आहे. प्रा. पेचे यांनी ह्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी चांगलेच भारवले. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी पेचे यांनी मंगळवारी परिसंवादाचे आयोजन केले आहे. यामाध्यमातून एक चर्चा घडवली जाणार आहे.

हेही वाचा -नवज्योत सिंग सिध्दूवरुन ट्रोल करणाऱ्यांना अर्चना पुरण सिंगने दिले उत्तर

Last Updated : Mar 14, 2022, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details