चंद्रपुर - शहरातील अत्यंत जुन्या आणि प्रतिष्ठित अनुदानित वसतीगृहात एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्यावर मागील एक वर्षापासून सामूहिक लैंगिक अत्याचार सुरू होते. वसतीगृहाचे कर्मचारी देखील यात सहभागी होते. या प्रकरणात आता या वसतीगृहाची मान्यता रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा समाज कल्याण कार्यालयाने या आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.
तरुणाचे लैंगिक शोषण-आत्महत्या; 'त्या' वसतीगृहाची मान्यता रद्द करण्याच्या हालचालिंना वेग - सामूहिक लैंगिक अत्याचार
शहरातील एका वसतीगृहात बारावीच्या मुलाचे लैंगिक शोषण केले जात होते. त्याचा अमानुषपणे छळ केला जात होता. मागील एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. अन्य सहकारी मित्र या मुलावर आळीपाळीने अत्याचार करत होते. त्याला रात्ररात्रभर झोपू द्यायचे नाहीत. अमानुषपने मारहाण करायचे. अश्लील शिवीगाळ करायचे. त्याचे सामान फेकून द्यायचे, त्याला नपुंसक म्हणून हिणवायचे. या मुलाने छळ करणाऱ्या मुलांची अनेकदा तक्रार केली होती. मात्र, वसतीगृहाचे अधिकारी, कर्मचारी उलट त्यालाच शिक्षा करत होते.

व्यवस्थापन म्हणून वसतीगृहात काय चालले आहे, विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाहीत, हे सर्व बघण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. मात्र, उलट याच वसतीगृहाचे काही कर्मचारी या मुलावर अत्याचार करत होते. हे वसतीगृह जणू या मुलाच्या अत्याचाराचे केंद्र बनले होते. अखेर या प्रकाराला कंटाळून 18 जानेवारीला या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच्या काही दिवसांत पोलिसांना त्या मुलाने लिहिलेली एक डायरी आढळली. आपल्यावरील लैंगिक अत्याचाराबाबत त्याने धक्कादायक खुलासे केले. यात आरोपीच्या नावांसह या मुलाने आपले कथन केले. यानंतर 11 विद्यार्थी आणि 3 कर्मचारी आशा 14 जणांना अटक करण्यात आली आहे. वसतीगृह व्यवस्थापनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने एका निष्पाप मुलाचा नाहक जीव गेला, हे यातून स्पष्ट होत आहे. आता ह्या वसतीगृहाची मान्यताच रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत समाज कल्याण विभागाचे आयुक्त यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे.