चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून सर्वात उष्ण शहर म्हणून जगाच्या पटलावर आलेल्या चंद्रपूर शहराला आज या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे मागील अनेक दिवसांपासून उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या चंद्रपूरकरांनी सुटकेचा श्वास सोडला.
सर्वात 'उष्ण' म्हणून जगाच्या पटलावर गेलेल्या शहरावर अखेर वरुणराजाची कृपा
हवामान खात्याने मान्सून एक आठवडा लांबणीवर गेला असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे चंद्रपुरकरांचा आणखी हिरमोड झाला. अशातच आज पाऊल पडल्याने चंद्रपुरकरांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला.
सध्या चंद्रपुरात उष्णतेचा पारा शिगेला पोचला आहे. गेल्या काही दिवसांत हे तापमान तब्बल ४८ डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती होती. त्यामुळे येथील नागरिक मान्सूनची चातकाप्रमाणे वाट बघत होते.
हवामान खात्याने मान्सून एक आठवडा लांबणीवर गेला असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे चंद्रपुरकरांचा आणखी हिरमोड झाला. अशातच आज चंद्रपुरकरांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला. संध्यकाळच्या सुमारास येथे वादळी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने चंद्रपुरकर सुखावले आहेत.