चंद्रपूर- सावली पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मौजा व्याहाळ खुर्द येथील कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांनी कोबंड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सुदर्शन पितृ भोयर (वय- 25 वर्ष, नवेगाव तुकुम ), नामदेव विठु साखरे (वय - 50, कापशी), सुधीर अंबरीश राऊत (वय - 30) यांना अटक केली आहे. तर 10 दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
चंद्रपुरात कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत - Chandrapur Crime news
मौजा व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात कोंबडा बाजार भरवून कोबंड्याच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली.
![चंद्रपुरात कोंबडा बाजारावर पोलिसांचा छापा; तीन आरोपी अटकेत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4949872-959-4949872-1572789606272.jpg)
चंद्रपुरात चंद्रपुरात कोंबडा बाजारावर पोलीसांचा छापा
हेही वाचा - विम्याचा लाभ हवा असेल, तर कापूस पावसात भिजू द्या..! विमा प्रतिनिधीचा अजब सल्ला
मौजा व्याहाळ खुर्द येथील शेत शिवारात कोंबडा बाजार भरवुन कोबंड्याच्या झुंजीवर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड टाकली. या ठिकाणाहून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली तर काही जण फरार होण्यात यशस्वी झाले. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींच्या 10 दुचाकी आणि 3 कोंबड्या जप्त केल्या आहेत.