चंद्रपूर- कोरपना तालुक्यात येणाऱ्या लखमापूर येथील पोलीस पाटलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज (शनिवार) दहा वाजता उघडकीस आली. समाधान एकनाथ वडस्कर (35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस पाटलाची आत्महत्या; चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील घटना - चंद्रपूर आत्महत्या
पोलीस पाटील समाधान वडस्कर यांनी आपल्या शेतमजुराला बैलगाडी शेतात घेऊन यायला सांगितले आणि स्वत: भोयगाव-लखमापूर रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले. काही वेळानी शेतात आलेल्या शेतमजुराला शेतातील गोठ्यात समाधान गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.
![पोलीस पाटलाची आत्महत्या; चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील घटना police patil suicide in chandrapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6845112-656-6845112-1587211422847.jpg)
police patil suicide in chandrapur
कोरपना तालुक्यात येणाऱ्या लखमापूर येथील पोलीस पाटील समाधान वडस्कर यांनी आपल्या शेतमजुराला बैलगाडी शेतात घेऊन यायला सांगितले आणि स्वत: भोयगाव-लखमापूर रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले. काही वेळानी शेतात आलेल्या शेतमजुराला शेतातील गोठ्यात समाधान गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले.
दरम्यान, घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना देण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करित आहेत.