चंद्रपूर - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सूरू आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा सूरू आहे. असे असताना विनाकारण " पोट्टे " रस्त्यावर दिसत आहेत. या पोरांना वैतागलेल्या राजुरा येथील पोलीस निरीक्षकांनी पालकांना आवाहन केले आहे. पालकांनो " पोट्ट्यांना सांभाळा,अन्यथा कारवाई करु ". आम्ही पोलीस आहोत..! यंत्रमानव नाही.. हाडामासाची माणसे आहोत. तूम्ही सूरक्षित राहावे यासाठी आमचे काम सूरू आहे, सहकार्य करा, असे भावनिक आवाहन राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांनी केले आहे.
पालकांनो..! आपल्या " पोट्ट्यांना " आवरा हो..! पोलीस निरीक्षकाचे पालकांना भावनिक आवाहन - lockdown
संचारबंदीची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा दिवस-रात्र एक करत आहेत. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पोरांमुळे राजूरा पोलीस वैतागले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सूरू आहे. घरात रहा..सूरक्षित रहा..! असे आवाहन शासन, प्रशासन करत आहे. दूसरीकडे संचारबंदीची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा दिवस-रात्र एक करत आहेत. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पोरांमुळे राजुरा पोलीस वैतागले आहेत. वारंवार सूचना देऊन घराबाहेर पडणाऱ्या या मुलांवर कारवाईचा बडगाही पोलिसांनी उगारला तरीही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या तरुणांचे प्रमाण कमी झाले नाही.
मैदानात खेळताना, गप्पा मारताना तरुण दिसून येत आहे. पोलीस दिसताच हे तरुण पळ काढतात अन् पोलीस गेल्यावर परत रस्तावर, चौकात दिसू लागतात. या प्रकाराला राजूरा पोलीस वैतागले आहेत. पोलिसांनी आता थेट पालकांनाच आवाहन केले. पालकांनो..! आपल्या पोट्ट्यांना सांभाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा..! असे आवाहन पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांनी दिला आहे. तूम्ही कुटुंबीयांसोबत घरात राहा, आम्ही तुमच्या सूरक्षिततेसाठी दिवस-रात्र एक करत आहोत. शासन,प्रशासनाला सहकार्य करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.