महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात पोलीसमित्रच निघाला दारूविक्रेता; 8 लाखांचा दारूसाठा जप्त - Police friend sale liquor chandrapur

रामू उत्तरवार हा पोलीस मित्र राहिलेला आहे. त्याच्यावर पोलीस आणि नागरिकांचा दुआ असण्याची जबाबदारी होती. मात्र, यानंतर त्याने दारूविक्रीला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून तो हा अवैध व्यवसाय करीत असल्याची महिती आहे.

Liquor seized chandrapur
Liquor seized chandrapur

By

Published : Jun 10, 2020, 6:52 PM IST

चंद्रपूर- मूल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत 8 लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे. यात आरोपी चक्क पोलीसमित्र असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

मूल तालुक्यातील मारोडा येथील रामू उत्तरवार हा दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल (मंगळवारी) मध्यरात्री त्याच्या घराजवळ पोलिसांनी सापळा रचला. पोलीस पंचासमक्ष रामूच्या घरावर पहारा देवून बसले होते. रात्री 2 वाजता एक टाटा सुमो वाहन क्र. (एम. ए. 3866) आली. त्याची तपासणी केली असता 20 पेटी देशी दारू त्यात आढळून आली.

रामू उत्तरवार हा पोलीस मित्र राहिलेला आहे. त्याच्यावर पोलीस आणि नागरिकांचा दुआ असण्याची जबाबदारी होती. मात्र, यानंतर त्याने दारूविक्रीला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून तो हा अवैध व्यवसाय करीत असल्याची महिती आहे.

या प्रकरणात पोलिसांनी रामू उत्तरवारसह निखिल देवगिरीकर, अनिकेत गौरकार यांना अटक केली आहे. हे दोघे आरोपी सिंदेवाही तालुक्यातील आहेत. पोलिसांनी दारूसह, टाटा सुमो वाहन, मोबाईल जप्त केले आहे. आज आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, पुंडलिक परचाके, शफीक शेख, श्रावण कुत्तरमारे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details