चंद्रपूर- दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातच दारुचा महापूर सूरू आहे. दारू तस्करीचे प्रकार रोजच उघडकीस येत आहेत. सातत्याने होणाऱ्या पोलीस कारवाईने पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेला दारूसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी 144 गुन्हात जप्त करण्यात आलेली 39 लाखांची दारू नष्ट केली.
39 लाखाच्या दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला बुलडोजर हेही वाचा - चंद्रपूर: विद्यार्थीनीच्या प्रबंधाची आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने घेतली दखल
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीसांनी 144 गुन्ह्यात पकडलेली 39 लाख 41 हजार 120 रुपये किमतीची दारू नष्ट केली. 2015 ते 2019 या वर्षात ही दारू पकडण्यात आली होती. या दारूने पोलीस ठाण्याचा मालखाना हाऊसफुल्ल झाला होता. नवीन गुन्ह्यात पकडण्यात येणारी दारू ठेवायची पंचायत झाल्याने पोलिसांनी दारू नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाकडून ही परवानगी मिळाल्यानंतर गोपालपूर रोडवर बुलडोजर चालवून दारूसाठा नष्ट करण्यात आला.
हेही वाचा - गावालाच दिले शाळेचे स्वरूप, मुलांचा हसत-खेळत अभ्यास होण्यासाठी उपक्रम
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, ठाणेदार गोपाल भरती यांच्या मार्गदर्शनात व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संजय आकेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.