चंद्रपूर - दारू पिऊन पत्नीला मारहाण Husband Beaten To Wife In Chandrapur करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी Police Constable Brutally Beaten To Accused चांगलाच चोप दिला. यामुळे तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही घटना गडचांदूर पोलीस ठाण्याच्या Gadchandur Police Station हद्दीत घडली असून अनिकेत भास्कर पावडे असे पीडिताचे नाव आहे. शुभम तिवारी असे त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात वैद्यकीय अहवालात Medical Report पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा शेरा देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत आता जिल्हा पोलीस अधीक्षक Superintendent Of Police Chandrapur यांच्या निर्देशानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पत्नीसोबत नेहमी होते भांडणअनिकेतचे त्याच्या पत्नीसोबत वारंवार भांडण होत होते. यात तो पत्नीला मारहाण Youth Beaten To Wife From Family Dispute करायचा. यापूर्वी देखील त्याच्या पत्नीने यासंदर्भात त्याच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. 30 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता कौटुंबिक कारणावरून गडचांदूर पोलीस स्टेशमध्ये Gadchandur Police Station अनिकेतला बोलावण्यात आले होते. यावेळी शुभम तिवारी या पोलीस शिपायाने Police Constable Brutally Beaten To Accused कायदा हातात घेत त्याला बेदम मारहाण केली. मात्र बेदम मारहाण झाल्याने अनिकेतला रात्री 9.30 वाजता ग्रामीण रुग्णालय गडचांदूर Rural Hospital Gadchandur येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु सदर गडचांदूर रुग्णालयात थातूर- मातुर उपचार करून, कोणतीही चाचणी न करता रात्री 3 वाजता सुट्टी दिली.