महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Complaint Against MP Dhanorkar : खासदार धानोरकरांविरोधात पोलिसांत तक्रार; सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाला धमकावल्याचे प्रकरण - Police complaint against MP Dhanorkar

एका सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून धमकावल्या ( threatening the manager of a co-operative society ) प्रकरणी खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Police complaint against MP Dhanorkar) करण्यात आली आहे. भद्रावती सहकारी संस्थेचे (Bhadravati Co-operative Society) व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांनी तक्रार केली असून धानोरकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

MP Balu Dhanorkar
खासदार बाळू धानोरकर

By

Published : Apr 20, 2022, 1:46 PM IST

चंद्रपूर:राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांची ओळख आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या संस्थेची निवडणूक 22 मे ला होणार आहे. त्यानुसार निवडणूकीची प्रक्रिया आज भद्रावती येथील सहायक निबंधक यांच्या कार्यालयात सुरू होती. यावेळी तक्रारदार व्यवस्थापक गोविंद ठाकरे हजर होते. यादरम्यान खा. धानोरकर यांचा त्यांना फोन आला. आपण कुठे आहात असे विचारत त्वरित सहकारी संस्थेच्या कार्यालयात हजर व्हा असा आदेश त्यांनी दिला. त्यानुसार ठाकरे हे हजर झाले. यावेळी धानोरकर यांच्यासोबत 20 ते 25 कार्यकर्ते होते. धानोरकर यांनी ठाकरे यांना संस्थेचे महत्वाचे कागदपत्रे आणि यादी देण्याची मागणी केली.

यावेळी ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असून संस्थेचे महत्त्वाचे कागदपत्रे नियमानुसार देता येत नाही, आपण ते निवडणूक अधिकाऱ्यांकडून घ्यावे असे म्हटले. यावर धानोरकर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करत, जर तू कागदपत्रे दिली नाहीत तर तुझे हातपाय तोडल्याशिवाय मी राहणार नाही अशी धमकी दिली. यावेळी धानोरकर यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना अडवले आणि पूढील अनर्थ टळला. मात्र यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याबाबत व्यवस्थापक गोविंद ठाकरे यांनी संस्थेकडून तक्रार दिली असून त्यात सुधीर पिजदूरकर, सतीश नगराळे, राजू टाले, उमेश जीवतोडे यां कर्मचाऱ्यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात खासदार धानोरकारांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार भारती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या विरोधा विविध कलमान्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत खासदार बाळू धानोरकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असले कृत्य केले नसल्याचे सांगितले. आपल्याविरोधात पोलीस तक्रार झाली याची काहीही कल्पना नाही असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Goons Beaten By Police In Chandrapur : तलवारीचा धाक दाखवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

ABOUT THE AUTHOR

...view details