चंद्रपूर चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनादरम्यान (chandrapur ganesh immersion) चंद्रपूरचा राजा गणेश (raja of chandrapur) मंडळाचे कार्यकर्ते, भाविक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज 9Police baton charge) केला. चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाने कारवाईची मागणी केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. तर, पुढील चौकशी सुरू आहे.
घडलेला प्रकार असा कीकाल चंद्रपुरात गणेश विसर्जनास सुरुवात झाली. चंद्रपूर शहरातील गणेशमंडळानी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी मिरवणूक काढली. अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. आज सकाळी 2 वाजताच्या सुमारास चंद्रपुरातील मानाचा गणपती समजला जाणारा चंद्रपूरचा राजा या गणेशमंडळाची मिरवणूक जयंत टॉकीजजवळ होती. ही मिरवणूक संथगतीने जात होती. त्यामुळे पोलिसांनी मागच्या गणेश मंडळांना पुढे जाण्यास वाट मोकळी करून दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार उपस्थित होते. यादरम्यान चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील सदस्यांनी पोलिसांना याबाबत विचारणा केली. असता त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रपूरचा राजा गणेश मंडळातील कार्यकर्ते, गणेश भक्तांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.