महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारु तस्करी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी जिल्हा सचिवाला अटक, १ लाख २० हजाराची दारु जप्त - congress worker

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून दारुची तस्करी करण्यात विविध पक्षाचे कार्यकर्ते गुंतले असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता यामध्ये आणखी एका पदाधिकाऱ्याचा समावेश झाला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव संदीप सिडाम याच्यासह ३ आरोपींना वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे.

१ लाख २० हजाराची दारु जप्त

By

Published : Jun 6, 2019, 3:04 AM IST


चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून दारुची तस्करी करण्यात विविध पक्षाचे कार्यकर्ते गुंतल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता यामध्ये आणखी एका पदाधिकाऱ्याचा समावेश झाला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव संदीप सिडाम याच्यासह ३ आरोपींना वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी १ लाख २० हजारांची दारु जप्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ४ वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली. मात्र, तरीही जिल्ह्यात दारूची विक्री सुरू आहे. दामदुप्पटीने जिल्ह्यात गल्लोगल्ली दारू मिळत आहे. त्यामुळे दारुबंदीच्या फोलपणावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सध्या तर याबाबत राजकीय वातावरण तापले आहे. नुकतेच निवडून आलेले काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी खुल्या व्यासपीठावर आता दारुबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फक्त चंद्रपुरातच का तर संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी करावी असे आवाहन ते सत्ताधाऱ्यांना करीत आहेत. याच दरम्यान काँग्रेसच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला दारुतस्करीत अटक करण्यात आली आहे. या व्यवसायातील नफा पाहून अनेक राजकिय पक्षाचे कार्यकर्ते यात सामील झाल्याचे दिसून येत आहे.

दारु तस्करी करणाऱ्या काँग्रेसच्या माजी जिल्हा सचिवाला अटक

वर्धा आणि चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, येथे अवैधरित्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. नागपूर येथून चंद्रपूर येथे अवैधरित्या विदेशी दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली. यात ३ आरोपींनाही अटक करण्यात आली. नागपूर चंद्रपूर मार्गावरील जाम चौरसत्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे कारची तपासणी केली असता विविध कंपनीची १ लाख २० हजाराची दारू जप्त केली. यात चंद्रपूर येथील चंद्रकांत पवार, ब्रिजेश तामगाडगे आणि संदीप सिडाम याला अटक केली आहे. वाहनासह पोलिसांनी एकूण ८ लाख ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details