चिमूर (चंद्रपूर)चिमूर शहरातून चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्ग जातो, हा महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या कडेलाच अनेक फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तसेच वाहनचालक रस्त्याच्या कडेलाच वाहने लावत असल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होते. आज अखेर पोलिसांकडून या अतिक्रमणावर कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आले.
या अतिक्रमणामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच रस्त्याच्या अगदी बाजुलाच दुकाने असल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी या अतिक्रमणावर कारवाई करत, ही रस्त्याच्या कडेची सर्व दुकाने हटवली आहेत. तसेच पुन्हा या ठिकाणी दुकाने न लावण्याच्या सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.