चंद्रपूर -जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे या जुगार क्षेत्रात कुख्यात असणाऱ्या गोलू ठाकरे याला देखील अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांना ऊत आला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हे जुगार अड्डे सर्रासपणे सुरू आहेत. यावर अद्याप मोठी कारवाई झालेली नव्हती. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील बाबनगर येथील एका घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कुलकर्णी यांनी आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून राजेश गुप्ता नामक व्यक्तीच्या घरी धाड टाकली. यात पैशांचा जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली. यात तब्बल 12 जणांना अटक करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त - चंद्रपूर जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर छापा
चंद्रपूर जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे या जुगार क्षेत्रात कुख्यात असणाऱ्या गोलू ठाकरे याला देखील अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
हे ही वाचा -पाटर्यांची निमंत्रणे आघाडी सरकारच्या मंत्र्यांना कशी येतात?, प्रवीण दरेकरांचा सवाल
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जुगार क्षेत्रात कुप्रसिद्ध नाव असलेल्या गोलू उर्फ ईश्वर ठाकरे याला अटक करण्यात आली. तसेच इतर आरोपींमध्ये राजेश गुप्ता, प्रदीप गंगमवार, हाफिज रेहमान, शेख चांद, नंदकुमार खापणे, गणेश सातपाडे, समीर संखारी, आकाश रागीट, गौरव बंडीवार, श्रीनिवास रंगेरी, सुरेश वावरे याचा यात समावेश आहे. घटनास्थळी नगदी दोन लाख रुपये, 11 मोबाईल, 3 चारचाकी आणि 2 दुचाकी असा तब्बल 36 लाख 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कुलकर्णी यांच्या धडक कारवाईमुळे जुगार अड्डा चालविणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.