महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपग्रहाचे जळलेले तुकडे लाडबोरीला पडले; अभ्यासकांनी केली पाहणी

काल रात्री अचानक आकाशात उल्कापात झाल्याचे दिसून आले. यातील काही भाग हे सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात पडल्याचे उघड झाले. मात्र हा कुठला उल्कापात नसून उपग्रहाचे तुकडे (Pieces of the burnt satellite fell to Ladbori) असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी खगोलीय अभ्यासकांची टीम पोचली (A team arrived for the inspection) असून त्यांच्याकडून ह्या तुकड्यांचे संकलन केले जात आहे.

Pieces of satellite
उपग्रहाचे तुकडे

By

Published : Apr 3, 2022, 10:20 AM IST

Updated : Apr 3, 2022, 11:55 AM IST

चंद्रपूर: काल रात्री सिंदवाही तालुक्यातील लाडबोरी या गावाच्या परिसरात लोकांनी जोराचा आवाज ऐकला. पुढे हा आवाज एखाद्या विमानासारखा झाला. मात्र त्यानंतर एखादा मोठा स्फोट झाल्याचे गावकऱ्यांनी ऐकले. वास्तविक उपग्रहाचे तुकडे या ठिकाणी जळून पडले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यामध्ये एक जळालेली रिंग आणि एक गोल वस्तूचा समावेश आहे.एक मोठी रिंग एका बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर पडली. तीचा आकार साधारण दहा बाय असुन, जाडी आठ ते दहा इंच असून वजन 40 किलो आहे.

उपग्रहाचे तुकडे

खगोलीय अभ्यासकांनुसार न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला.आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. आज या ठिकाणी खगोलीय अभ्यासकांची टीम पोचली त्यांनी जळालेल्या उपग्रहाच्या तुकड्यांचे संकलन केले आहे. उपग्रह सोडताना त्याच्या मागचा भाग पृथ्वीच्या कक्षात येऊन पडल्याची शक्यता आहे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

उपग्रहाचे तुकडे
उपग्रहाचे तुकडे



Last Updated : Apr 3, 2022, 11:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details