चंद्रपूर-लॉकडाऊन असतानाही खड्डयात पडेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठी नागरिक धावून आले. अनेकदा प्रयत्न केल्यांनंतर बैलाला खड्ड्यातून सूखरुप बाहेर काढण्यात नागरिकांनी यश आले.
लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडत त्यांनी दिले बैलाला जीवदान - Lockdown
शौचालयासाठी खोदलेल्या खड्ड्यात बैल पडला होता. लॉकडाऊन असतानाही मुक्या प्राण्यासाठी नागरिकांनी कायदा बाजूला ठेवत बैलाला जीवदान दिले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे शनिवारी सायंकाळी घडली.
लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडत त्यांनी दिले बैलाला जीवदान
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील बालाजी निमगडे यांनी घराशेजारी शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्यात प्रदिप अवथरे यांचा बैल चूकून पडला. बैलाला खड्ड्यातून बाहेर निघणे कठिण झाले होते.
लॉकडाऊन असतानाही बैलाला वाचविण्यासाठी गोजोलीच्या नागरिकांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.