चंद्रपूर - येथील वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांचा आज उद्रेक पाहायला मिळाला. शेकडोंच्या संख्येने हे मजूर जमून आपल्या स्वगावी निघाले. वेळीच पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढली आणि मोठा अनर्थ टळला.
चंद्रपूरमध्ये परराज्यातील बांधकाम मजूरांचा उद्रेक, शेकडोंच्या संख्येने उतरले रस्त्यावर - वैद्यकीय महाविद्यालय
वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या जेवणाची सोय ठेकेदाराने न केल्याने तसेच श्रमिक विशेष रेल्वे गेल्याचे लक्षात येताच मोठ्या संख्येने कामगार गावी जाण्यासाठी रस्त्यावर उतरले.
शुक्रवार (दि. 1 मे) छत्तीसगडसाठी श्रमिक विषेश रेल्वे नाशिकहून धावल्याचे या मजुरांच्या लक्षात आले. त्यामुळे मजुरात उद्रेकांची ठिणगी पडली. आम्हीही आता मिळेल त्या साधनाने परत जाऊ, असे म्हणत हे मजूर शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या गावाकडे प्रस्थानही केले. मात्र, वेळीच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने त्यांची समजूत काढण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी मजुरांचे काही प्रतिनिधी आणि कंत्राटदारांना चर्चेसाठी रामनगर पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. यात जो अंतिम तोडगा निघणार त्यानुसार मजूर निर्णय घेणार आहेत.
हेही वाचा -कोटा येथे अडकलेले विद्यार्थी पोहचले स्वगावी; 51 विद्यार्थ्यांचा समावेश