महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Agitation in Chandrapur : आयुक्त मोहितेंविरोधात उपोषण करणारे पवार यांची प्रकृती खालावली ; आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम - Agitation in Chandrapur

चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या विरोधात आमरण उपोषण करणारे लातूर येथील लक्ष्मण पवार यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Pawar on a hunger strike deteriorated) आहे. मात्र जोवर मोहिते यांच्यावर कारवाई होणार नाही, तोवर आपण उपोषण सोडणार नाही. असा पवित्रा पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे आयुक्त मोहिते यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत (Pawar on hunger strike against Commissioner Mohit) नाहीये.

Pawar on a hunger strike
आयुक्त मोहितेंविरोधात पवार यांचे उपोषण

By

Published : Sep 25, 2022, 10:42 AM IST

चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या विरोधात आमरण उपोषण करणारे लातूर येथील लक्ष्मण पवार यांची तिसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Pawar on a hunger strike deteriorated) आहे. मात्र जोवर मोहिते यांच्यावर कारवाई होणार नाही, तोवर आपण उपोषण सोडणार नाही. असा पवित्रा पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे आयुक्त मोहिते यांच्या अडचणी अद्यापही कमी होताना दिसत (Pawar on hunger strike against Commissioner Mohit) नाहीये.

प्रतिक्रिया देताना उपोषणकर्ते पवार



चंद्रपूरमहानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या विरोधात सत्ताधारी असलेले भाजपचे पदाधिकारी आणि महापौर यांनी देखील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत. तत्पूर्वी 2016 मध्ये मोहिते हे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे स्वीय सहाय्यक असताना लातूर येथील लक्ष्मण पवार यांच्या आश्रमशाळेला शासकीय मान्यता मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडून 15 लाख लाच घेतल्याचा आरोप आहे. मात्र पैसे देऊनही त्यांच्या आश्रमशाळेला शासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी पवार हे आयुक्त मोहिते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत (Pawar on a hunger strike) होते.

मोहिते यांच्यावर कारवाई केली जात नाही तोवर उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार -यादरम्यान, लातूर येथे आयुक्त मोहिते आणि लक्ष्मण पवार यांच्यात एक करार देखील झालेला होता. ज्यामध्ये मोहिते यांना आता कुठलाही त्रास मी देणार नाही, अशा पद्धतीचा हमीपत्र पवार यांनी दिलं होतं, मात्र यादरम्यान मोहिते यांनी पवार यांना एका खासगी कंपनीत कायमची नोकरी आणि दिव्यांग मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च उचलण्याची हमी पवार यांना दिली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, याची पूर्तता न झाल्याने पवार यांनी यापूर्वी चंद्रपुरात आयुक्त मोहिते यांच्या केबिनमध्ये जाऊन स्वतःवर चाकू हल्ला करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र लातूरमध्ये गेल्यानंतर पवार हे पुन्हा परत आले आणि आता ते आयुक्त मोहिते यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जोवर माझे पूर्ण पैसे परत केले जात नाही आणि मोहिते यांच्यावर कारवाई केली जात नाही तोवर उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार पवार यांचा आहे. याच दरम्यान उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला (hunger strike against Commissioner Mohit) दिला.

पोलिसांनी देखील त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी दबाव आणला. मात्र रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरही हे उपोषण कायम ठेवणार, असा पवित्रा लक्ष्मण पवार यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मोहिते यांच्या विरोधामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस उरलेले असताना अशा पद्धतीने त्यांच्या विरोधात होणारे आंदोलन हे त्यांच्या अडचणीत वाढ करणारे आहे. यादरम्यान मोहिते हे संपूर्णतः संपर्काच्या बाहेर असून गेल्या अनेक दिवसांपासून ते रजेवर आहेत. पवार यांच्या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असून या संदर्भातले पत्र त्यांनी नगर विकास खात्याच्या अप्पर सचिवांना पाठविले (Agitation in Chandrapur) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details